जुनी पेन्शनच्या मागणीसाठी शासकीय निमशासकीय, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने पुकारलेल्या बेमुदत संपास सुरुवात : उद्या शुक्रवारपासून तालुकास्तरावर आंदोलन करण्याचा निर्धार
|
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
जुनी पेन्शनच्या मागणीसाठी शासकीय निमशासकीय, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने पुकारलेल्या बेमुदत संपास सुरुवात : उद्या शुक्रवारपासून तालुकास्तरावर आंदोलन करण्याचा निर्धार

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी शासकीय निमशासकीय, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने पुकारलेल्या बेमुदत संपाला आजपासून सुरुवात झाली. सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनेच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतल्यामुळे सरकारी कामकाजावर परिणाम झाला. शाळा, महाविद्यालये बंद होती. महसूल, आरोग्य, बांधकाम, जलसंपदा, परिचारक, विभागाचे कर्मचारी, मुख्याध्यापक, शिक्षक, लिपिक असे विविध विभागातील कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत. उद्या शुक्रवारपासून तालुकास्तरावर आंदोलन करण्याचा निर्धार करण्यात आला.
टाऊन हॉल, कोल्हापूर येथे सरकारी कर्मचाऱ्यांनी एकत्रित येऊन सरकारचा निषेध केला. तसेच जुनी पेन्शन योजना लागू होईपर्यंत आंदोलन चालू ठेवण्याचा निर्धारही केला. राज्य सरकारकडून सरकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या मागण्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ सरकारी निम सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना समन्वय समितीचे नेतृत्वाखाली १४ डिसेंबर पासून बेमुदत संपाची हाक देण्यात आली होती. त्यानुसार गुरुवारी सकाळपासूनच कर्मचाऱ्यांनी संपामध्ये सहभाग नोंदवून या आंदोलनाला पाठिंबा दिला.
सकाळी १० वाजल्यापासून टाऊन हॉल येथील बागेमध्ये विविध संघटनेचे पदाधिकारी कर्मचारी शिक्षक दाखल होऊ लागले. एकच मिशन जुनी पेन्शन, पेन्शन आमच्या हक्काची यासह विविध घोषणानी परिसर दणाणून सोडला. ‘एकच मिशन जुनी पेन्शन’ असा मजकूर असलेल्या टोप्या परिधान केल्या होत्या. कर्मचाऱ्यांनी पेन्शन योजनेचा लढा यशस्वी केल्याशिवाय आता माघार नाही असा इशारा दिला.कामगार एकजुटीचा विजय असो या घोषणाने परिसर दणाणला.
यावेळी समन्वय समितीचे निमंत्रक अनिल लवेकर, वसंत डावरे, शैक्षणिक व्यासपीठाचे एस.डी. लाड, शिक्षक नेते दादासाहेब लाड, भरत रसाळे, मुख्याध्यापक संघाचे सुरेश संकपाळ, कृती समितीचे कार्याध्यक्ष बाबा पाटील, व्ही. जी. पोवार, नर्सिंग संघटनेच्या हाश्मिता हावेरी यांच्यासह वेगवेगळ्या संघटनेचे पदाधिकारी आंदोलनास सहभागी झाले होते. या आंदोलनात पन्नासहून अधिक सरकारी कर्मचारी संघटनाने प्रत्यक्ष सहभाग घेतला आहे. आंदोलनात गव्हर्नमेंट बँकेचे उपाध्यक्ष अजित पाटील, संचालक रमेश घाटगे, प्रकाश पाटील, संजय खोत, मनुज रेणके, एनपीएस हटाव जिल्हा मध्यवर्ती संघटनेचे संघटक राहुल बर्गे, धोंडीराम चव्हाण, राज गंधवाले, उमेश सावंत, संतोष अनुसे, सीपीआर कर्मचारी संघटनेचे रमेश भोसले, कृष्णा नायक, संजीवनी दळवी, गणेश आसगावकर, रमेश कडेकर, असलम महालदार, राणी चावरे आदींचा सहभाग होता. मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष विठ्ठल वेलणकर, नंदकुमार इंगवले, राजदीप घोडके, नितीन कांबळे, महसूल संघटनेचे राहुल शिंदे, अंकुश रानमाळे, सुनील देसाई, आरोग्य कर्मचारी संघटनेचे एम एम पाटील, एम एम भाट, मिलिंद पांगिरेकर, कोजिमाशिचे चेअरमन बाळ डेळेकर, राजेश वरक, संतोष आयरे, राजेंद्र पाटील, दिलीप माने, सुधाकर सावंत, उमेश भोसले, महेश सावंत, गव्हर्नमेंट प्रेस मधील संजीव पाटील, संतोष भिके, परिचारिका संघटनेच्या विमल कलघुटकी यांचा सहभाग होता. ऑल इंडिया वैद्यकीय अधिकारी संघटनेचे राजेश गायकवाड यांनीही आंदोलनाला पाठिंबा दिला.
शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर यांनी नागपूरहुन संपास पाठींबा देऊन संप यशस्वी करण्याचे आवाहन केले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा





