नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या गडकोटांचे संवर्धन करणे काळाची गरज : शिवव्याख्याते गजानन देसाई – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या गडकोटांचे संवर्धन करणे काळाची गरज : शिवव्याख्याते गजानन देसाई

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या गडकोटांचे संवर्धन करणे काळाची गरज : शिवव्याख्याते गजानन देसाई

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कडगांव
छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राच्या भूमीत जन्मलेले आदर्शवादी, नीतीवंत महापुरुष होते. मुघलशाही, आदिलशाही, निजामशाही, बरीदशाही या शाह्यांच्या असंस्कृत राज्यांच्या पलीकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठलीही शाही उभी न करता स्वराज्य उभं केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले अनेक गडकोट आज शेवटची घटका मोजत आहेत. त्यांचे संवर्धन होणे काळाची गरज असल्याचे मत शिवव्याख्याते गजानन देसाई यांनी व्यक्त केले.
करडवाडी (ता.भुदरगड) केंद्राअंतर्गत घेण्यात आलेल्या किल्ला स्पर्धेच्या बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलत होते. यावेळी भुदरगड तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे प्रमुख उपस्थित होते. अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापनाचे अध्यक्ष सोपान खतकर होते.
छ.शिवरायांचे स्वराज्याबद्दल असणारे प्रेम, निष्ठा, पराक्रम व निष्कलंक चारित्र्य, शेतकऱ्यांवर जीवापाड प्रेम करणारे व परस्त्रीला आई समान मानणारे शिवाजी महाराज हे एकमेव प्रजादक्ष राजे होते ते शतकानु-शतके लोकांच्या स्मरणात राहतील, आयुष्यामध्ये एकदा तरी बापाने मुलांना रायगड दाखवावा अन्याया विरुद्ध लढण्याची ताकत रायगडच्या मातीत आहे असेही श्री. देसाई म्हणाले.
यावेळी गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे म्हणाले, महापुरुषांचे विचार आत्मसात केले पाहिजेत महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन आणि विचारांचे दफन होणे घातक असून महापुरुषांना डोक्यावर नाही तर डोक्यात घेणं गरजेच आहे. महाराष्ट्राला छत्रपती शिवरायांचे चरित्र माहीत आहे, मात्र त्यांचे चारित्र्य समजून घेण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सरपंच विनोद कांबळे, शितल पाटील, सुरेखा राऊळ, संगीता गवस, उप सरपंच सागर खतकर, मारुती रानमाळे, नंदकुमार नार्वेकर, केशव देसाई आदी उपस्थित होते. स्वागत मुख्याध्यापक भारती पसारे यांनी, सूत्रसंचालन रविंद्र गुरव यांनी तर आभार डॉ.एस.बी.शिंदे यांनी मानले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031