निळपण येथे २१ ते २३ डिसेंबर या कालावधीत तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन : प्राथमिक, माध्यमिक शाळांचा सहभाग
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
निळपण येथे २१ ते २३ डिसेंबर या कालावधीत तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन : प्राथमिक, माध्यमिक शाळांचा सहभाग
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, निळपण
पंचायत समिती, भुदरगड शिक्षण विभागाच्या वतीने निळपण (ता.भुदरगड) येथील जवाहर हायस्कूल प्रशालेत २१ ते २३ डिसेंबर या कालावधीमध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे यांनी दिली. या विज्ञान प्रदर्शनासाठी ‘समाजासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान’ असा विषय ठेवण्यात आला आहे.
गुरुवार २१ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता नावनोंदणी व मांडणी, स.१० वा. ग्रंथ दिंडी, स.११ वा. आमदार प्रकाशराव आबिटकर यांच्या हस्ते व मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन होणार आहे. याप्रसंगी माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. एकनाथ आंबोकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर, गटविकास अधिकारी डॉ. शेखर जाधव, संस्थेचे अध्यक्ष ॲड.संग्रामसिंह कडव उपस्थित राहणार आहेत.
शुक्रवार २२ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते ५ या वेळेत मूल्यमापन होणार आहे. शनिवार २३ डिसेंबर रोजी सकाळी १० वा संगीत मैफिल (प्राथमिक व माध्यमिक शिक्षक व विद्यार्थी), स.११ वा. ‘चला मुलांना तर्कशुद्ध विचार करायला शिकवूया’ (RATIONAL THINKING) या विषयावर सांगली येथील प्रसिध्द मानसोपचार तज्ज्ञ व समुपदेशक डॉ प्रदीप पाटील यांचे व्याख्यान होणार असून जिल्हा न्यायाधीश एस.एस.जगताप, महाराष्ट्र बार कौन्सिलचे अध्यक्ष व्ही. एन. घाटगे, दिवाणी न्यायाधीश व्ही.बी.मुल्ला, शिक्षण विस्तार अधिकारी प्रबोध कांबळे, उत्तम पाटील, निवृत्ती भाटले, सरपंच वैशाली पाटील उपस्थितीत राहणार आहेत. दुपारी १ वा. पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
