नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , सांगरुळ शिक्षण संस्थेचे कार्य शिक्षण क्षेत्राला प्रेरणादायी : उपजिल्हाधिकारी अशोक पाटील सांगरुळ शिक्षण संस्थेच्या ६५ व्या वर्धापन दिन साजरा – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

सांगरुळ शिक्षण संस्थेचे कार्य शिक्षण क्षेत्राला प्रेरणादायी : उपजिल्हाधिकारी अशोक पाटील सांगरुळ शिक्षण संस्थेच्या ६५ व्या वर्धापन दिन साजरा

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

सांगरुळ शिक्षण संस्थेचे कार्य शिक्षण क्षेत्राला प्रेरणादायी : उपजिल्हाधिकारी अशोक पाटील
सांगरुळ शिक्षण संस्थेच्या ६५ व्या वर्धापन दिन साजरा

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, सांगरुळ
सांगरुळ शिक्षण संस्थेचे विद्यार्थी शिक्षणाबरोबरच कला, क्रीडा व सामाजिक क्षेत्रातही दैदीप्यमान कामगिरी करीत आहेत. संस्थेचे कार्य शिक्षण क्षेत्राला प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी अशोक पाटील यांनी केले. सांगरुळ शिक्षण संस्थेच्या ६५ व्या वर्धापन दिन समारंभात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर व सातारा जिल्ह्याचे लेखा अधिकारी रणजीत झपाटे उपस्थित होते.
श्री. पाटील म्हणाले, आर्थिक पाठबळ देणारी कोणतीही शैक्षणिक शाखा नसताना सांगरुळ शिक्षण संस्था ग्रामस्थ व शिक्षक कर्मचारी यांच्या सहकार्याने ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलांना दर्जेदार शिक्षण देत आहे.
यावेळी बोलताना माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी सांगरुळ शिक्षण संस्थेचे नेतृत्व करणारे आमदार जयंत आसगावकर यांच्या नावातच आस असल्याने संस्थेची झपाट्याने प्रगती होत आहे. भविष्यात संस्थेने आपले नाव उज्वल करावे अशा शुभेच्छा दिल्या. सातारा जिल्हा लेखाधिकारी रणजीत झपाटे यांनी सांगरुळ शिक्षण संस्था शैक्षणिक, कला, क्रीडा व सामाजिक क्षेत्रात चांगले काम करणारी भावी पिढी घडवत आहे हे अभिमानास्पद असल्याचे सांगितले.
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक करताना सांगरुळ शिक्षण संस्थेचे सचिव आमदार प्रा. जयंत आसगावकर यांनी सांगरुळ शिक्षण संस्थेतील शिक्षक कर्मचारी गुणवंत व प्रामाणिक असल्याने संचालक मंडळामध्ये बहुतांशी सेवानिवृत्त शिक्षकांचा समावेश आहे. संस्था ग्रामस्थ व कर्मचारी यांच्या योगदानातून यशस्वीपणे वाटचाल करत असून डी.डी. आसगांवकर मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातून १८४ विद्यार्थी शासकीय सेवेत दाखल झाले आहेत. शैक्षणिक क्षेत्राबरोबरच क्रीडा क्षेत्रात विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर संस्थेचे नाव उज्वल केले आहे. शिक्षण संस्थाचालक, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांचे एक कुटुंब म्हणून संस्था वाटचाल करत असल्याचे त्यांनी सांगितले.
संस्थेच्या ध्वजाचे ध्वजारोहण दीपप्रज्वलन व संस्थेचे संस्थापक कैसब खाडे, केदरा नाळे मास्तर व गुरुवर्य स्व. डी.डी.आसगांवकर यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते केले. यानंतर विविध स्पर्धामध्ये सुयश मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनी व कर्मचारी आजी-माजी खेळाडू यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष य.ल.खाडे, उपाध्यक्ष के.ना.जाधव, गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस.डी.लाड, शिक्षक नेते दादासाहेब लाड, प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगचे अध्यक्ष बी. जी. बोराडे, कृती समितीचे बाबा पाटील, खंडेराव जगदाळे, व्ही. जी. पोवार, के. के. पाटील, कुंभीचे व्हा.चेअरमन विश्वास पाटील, संचालक राहुल खाडे, मुख्याध्यापक संघाचे चेअरमन सुरेश संकपाळ, दत्ता पाटील, मिलिंद पांगिरेकर, अजित रणदिवे, आर.वाय. पाटील, निवास वातकर, संजय पाटील, सौ.आसगावकर, सविता पाटील, श्रीमती इंदुबाई आसगावकर, यांच्यासह संस्थेच्या सर्व शाखांचे शाखाप्रमुख आजी माजी कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते आभार सहसचिव डी.एन. कुलकर्णी यांनी मानले सूत्रसंचालन आर.बी. गोंधळी व एन.आर.सणगर यांनी केले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728