नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू झाली असून या संदर्भातील आदेश लवकरात लवकर निघण्यासाठी प्रयत्नशील : आमदार प्रा.जयंत आसगावकर – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू झाली असून या संदर्भातील आदेश लवकरात लवकर निघण्यासाठी प्रयत्नशील : आमदार प्रा.जयंत आसगावकर

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू झाली असून या संदर्भातील आदेश लवकरात लवकर निघण्यासाठी प्रयत्नशील : आमदार प्रा.जयंत आसगावकर

पेन्शन आनंद मेळावा संपन्न

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे विधिमंडळात जाहीर झाले असून या संदर्भातील आदेश लवकरात लवकर निघण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन पुणे विभाग शिक्षक आमदार प्रा.जयंत आसगावकर यांनी केले.
विद्याभवन, कोल्हापूर येथे महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा कृती समिती, कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीने आयोजित पेन्शन आनंद मेळाव्यात आम.आसगावकर बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संघाचे माजी चेअरमन बी.जी.काटे होते. राज्य शासनाने १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त विनाअनुदानित, अंशतः अनुदानित शाळातील कर्मचारी यांना १९८२ ची जुनी पेन्शन योजना लागू केल्याचे विधिमंडळात जाहीर केले. अनेक वर्षे प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागल्यामुळे पेन्शन आनंद मेळावा संपन्न झाला.
आम. आसगावकर पुढे म्हणाले, १० जुलै २०२० ची अधिसूचना रद्द झाल्यामुळे पेन्शन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. राज्याचे माजी गृहराज्यमंत्री, आम.सतेज डी.पाटील यांच्या सहकार्यामुळेच अधिसूचना रद्द झाली. त्यानंतर पेन्शन मागणीसाठी कोल्हापूर येथे भव्य मोर्चा काढून सरकारचे लक्ष वेधले. आपल्या लढ्याला यश मिळाले असून याबाबतचा शासन आदेश लवकरच निघेल.
शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नाच्या सोडवणूकीसाठी सातत्याने पाठपुरावा सुरु असल्याचे आम.आसगावकर यांनी सांगितले.
यावेळी शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस. डी. लाड, कृती समितीचे कार्याध्यक्ष बाबा पाटील, शिक्षक नेते दादा लाड यांनी मनोगते व्यक्त केली.
यावेळी प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे अध्यक्ष बी. जी. बोराडे, खाजगी प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे, श्री.डी.बी.पाटील विचार मंचचे अध्यक्ष व्ही.जी.पोवार, सेवानिवृत्त मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष डी. एस.पाटील, विनानुदानित शाळा कृती समितीचे राज्याध्यक्ष खंडेराव जगदाळे, मुख्याध्यापक संघाचे माजी चेअरमन के. बी. पोवार, बाजार समितीचे माजी उपाध्यक्ष विलास साठे, मुख्याध्यापक संघाचे प्राचार्य मिलिंद पांगिरेकर, रविंद्र मोरे, सहसचिव अजित रणदिवे, लोकल ऑडीटर इरफान अन्सारी, सेवानिवृत्त सदस्य जीवनराव साळोखे, जे. बी. पाटील, एम. के.आळवेकर, सूर्यकांत चव्हाण, श्रीधर गोंधळी, बबन इंदुलकर, संजय देवेकर, जी. के. भोसले, पी बी. भारमल, दिपक पाटील, के. के. पाटील, विजय जाधव, जे. एम. पोवार, मनोहर पाटील यांच्यासह कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.
स्वागत व प्रास्तविक मुख्याध्यापक संघाचे चेअरमन सुरेश संकपाळ यांनी आभार संचालक श्रीकांत पाटील यांनी मानले. सूत्रसंचालन एच. वाय. शिंदे यांनी केले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728