नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , कुमार भवन, शेणगाव प्रशालेत ई- लर्निंग कीट व संगणक प्रदान कार्यक्रम संपन्न – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

कुमार भवन, शेणगाव प्रशालेत ई- लर्निंग कीट व संगणक प्रदान कार्यक्रम संपन्न

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

कुमार भवन, शेणगाव प्रशालेत ई- लर्निंग कीट व संगणक प्रदान कार्यक्रम संपन्न
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
श्री.मौनी विद्यापीठ संचलित कुमार भवन, शेणगाव (ता. भुदरगड) प्रशालेत ई लर्निंग कीट व संगणक प्रदान कार्यक्रम संपन्न झाला. श्री.धनंजय मुंगळे यांच्या प्रेरणेने व गर्जना प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने महिंद्रा फायनान्स मार्फत प्रशालेला १५ संगणक, ३ लर्निंग बोर्ड, १ स्मार्ट टिव्ही प्रदान करण्यात आला. अध्यक्षस्थानी श्री.मौनी विद्यापीठाचे संचालक प्राचार्य डॉ.पी.बी.पाटील व प्रमुख पाहुणे म्हणून शासकीय प्रतिनिधी श्री. बाजीराव चव्हाण हे उपस्थित होते.
प्रारंभी प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.अनिल कामत यांनी केले. महिंद्रा फायनान्सचे श्री.बळवंत कुलकर्णी, श्री अमित मिरजकर, गर्जना प्रतिष्ठानचे श्री.प्रकाश तुकाराम बेलवाडे, दिगंबर तुकाराम मिसाळ यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी श्री.मिलिंद ताम्हणकर, केंद्रप्रमुख श्री. सागर सुतार, श्री.एन.डी.कुंभार, श्री.नाटळे गुरुजी, श्री.संग्राम कांबळे, जीवन शिक्षण विद्या मंदिर व कुंभारवाडा विद्यामंदिरच्या सर्व शिक्षिका, पालक, ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, व कुमार भवन प्रशालेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन श्री.राजू शिंदे यांनी केले तर आभार श्री.एस बी.बाजारी यांनी मानले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031