बालवैज्ञानिकांची राज्यस्तरीय बाल विज्ञान परिषदेसाठी निवड : चार प्रकल्पांचा समावेश
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
बालवैज्ञानिकांची राज्यस्तरीय बाल विज्ञान परिषदेसाठी निवड : चार प्रकल्पांचा समावेश
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
विज्ञान व तंत्रज्ञान विभागामार्फत जिल्हास्तरिय बाल विज्ञान परिषदेत १०५ बालवैज्ञानिकांनी संशोधन प्रकल्प सादर केले. ‘आरोग्य आणि कल्याणासाठी परिसंस्था’ हा विषय होता. यातून सात उत्कृष्ट प्रकल्पांची निवड विभागीय स्पर्धेसाठी करण्यात आली. महाराष्ट्रातून आलेल्या प्रकल्पातून जिल्ह्याच्या चार प्रकल्पांची निवड राज्यस्तरीय बाल विज्ञान परिषदेसाठी केली.
राज्यस्तरिय निवड झालेल्या चार संशोधन प्रकल्पांचे बाल वैज्ञानिक आणि मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. श्री.पाटील यांनी बालवैज्ञानिकांशी संवाद साधला. त्यांच्या संशोधन प्रकल्पाची माहिती घेतली. यावेळी माध्यामिक शिक्षणाधिकारी डॉ.एकनाथ आंबोकर, बाल विज्ञान परिषदेचे समन्वयक एम. बी. मुडबिद्रीकर उपस्थित होते.
राज्यस्तरिय निवड झालेल्या शाळा आणि बाल वैज्ञानिक असे : लोहिया हायकूल (निहार जोशी, अभिनव पोवार), खांडेकर प्रशाला (अनय दोशी, कैवल्फ शिंदे), न्यू हायस्कूल हुपरी (अथर्व देशपांडे, सार्थक नाईक), श्रीमंत माईसाहेब बावडेकर विद्यालय (ऋतुजा पाटील, वैभवी राऊत)

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
