नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , ३१ डिसेंबर साजरा करताना जंगलास धोका पोहचणार नाही याकडे लक्ष द्यावे : जंगलाची जपणूक करून आपला वर्तमान ‘समृद्ध’ करणे आवश्यक, वर्ल्ड फॉर नेचर टीमने आवाहन – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

३१ डिसेंबर साजरा करताना जंगलास धोका पोहचणार नाही याकडे लक्ष द्यावे : जंगलाची जपणूक करून आपला वर्तमान ‘समृद्ध’ करणे आवश्यक, वर्ल्ड फॉर नेचर टीमने आवाहन

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

३१ डिसेंबर साजरा करताना वृक्ष, प्राणी संपदा, जंगलास धोका पोहचणार नाही याकडे लक्ष द्यावे : जंगलाची जपणूक करून आपला वर्तमान ‘समृद्ध’ करणे आवश्यक,
वर्ल्ड फॉर नेचर टीमने आवाहन

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
२०२३ या वर्षातील शेवटचा दिवस ३१ डिसेंबर दोन दिवसांनी आहे. वर्षाअखेर म्हणून आपण सर्वजण सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटन, प्रवास, पिकनिक, सहल प्लॅन करतो व त्याचा आंनद घेतो. बहुतांशी लोकांचे हे ठरलेलं रुटीन आहे. आनंद साजरा करताना आपली वृक्ष, प्राणी संपदा, जंगलास धोका पोहचणार नाही याकडे लक्ष देण्याची आवश्यकता असून आपल्या हातात शिल्लक असलेल्या जंगलाची जपणूक करून आपला वर्तमान “समृद्ध” करणे एवढेच आपल्या हातात आहे. याकडे सर्वांनी लक्ष द्यावे असे आवाहन वर्ल्ड फॉर नेचर टीमने केले आहे.
आपण प्रवासाचा, पर्यटनाचा आनंद घेत असताना सह्याद्रीच्या रांगामधून, वळणदार घाट रस्त्यावर व घनदाट जंगलातून प्रवास करताना काही लोकं सहज रस्त्यावर टॉयलेट ब्रेक म्हणून उतरतात व जाताना वाळलेल्या गवतात काडी पेटवून टाकतात. असं करताना त्यांना लय भारी जाम मज्जा कायतरी वेगळं थ्रिल वाटत असते. काही महाभाग तर असे असे असतात की सिगारेट ची तलफ आली रे आली की घे रे गाडी रस्त्याकडेला, मग सिगारेट पेटवून ती ओढून झाली की ते राहिलेलं थोटकं त्या साईड पट्टीच्या बाजूला असलेल्या गवतावर टाकणार व एकदम मस्तपैकी फ्रेश मूडमध्ये आळस बिळस देऊन परत प्रवासाला लागणार. मग सोबत जंगलात रात्रीचे वनभोजन, त्यासाठी चूल पेटवायची मग शेकोटी पेटवायची….मौज मज्जा म्हणून ट्रिप, पिकनिक करणाऱ्या बऱ्याच जणांची ही एक टीपीकल सवय आहे.
पुढे काय होत असेल त्या सिगारेटच्या थोटकांचे आणी पेटलेल्या काडीपेटीतल्या काड्यांचे? न विझलेल्या शेकोटीचे? जेवणासाठी पेटवलेल्या चुलीचे? कधी विचार केला आहे काय आपण? काय होणार आहे त्या इवल्याशा काडी आणी जळलेली थोटकं यांच्यामुळे? विचार केला नसेल तर नक्की विचार करा.
कारण यापासून तयार झालेली ती जी छोटी ठिणगी असते, चिंगारी असते ती पूर्ण जंगल पेटवायला कारणीभूत ठरते. फक्त एका गवताच्या वाळलेल्या पात्यापासून तयार झालेली आग वणव्याच्या स्वरूपात पूर्ण जंगलात पसरते व तिच्या वाटेत येणाऱ्या सगळ्या झाड झुडूप, गवत वेली पालापाचोळा या सगळ्याची राख करते. अनेकदा जंगलांमध्ये ३१ डिसेंबर वर्षअखेर सेलिब्रेशनच्या नावाखाली पार्ट्या केल्या जातात मग तिथेच पेटत्या सिगारेटी टाकून जातात. बरीच हौशी लोकं चुली घालून जेवण करण्याचे प्रकार करतात. त्या न विझलेल्या चुलीतील ठिणग्या सुक्या पालापाचोळ्याला पेटायला पुरेशा असतात. तसेच चुकीच्या माहितीमुळे आजकाल आपल्याकडे जमिनीचा कस सुधारण्यासाठी जंगले आणी डोंगरांवरील गवत पेटवून देण्याचे फॅडच पसरलंय. त्यामुळे जंगलात राहणारे प्राणी असुरक्षित होऊन जीव वाचवायला बाहेर पडतात. पेटलेल्या जंगलांमुळे ससे, लहान पक्षी, साप असे अनेक प्राणी मरून जातात आणी मोठे प्राणी मिळेल तिकडे सैरावैरा धावत शहराकडे येतात.
जंगलात पेटलेल्या आगीमुळे कोणावर, किती आणी कसा फरक पडतो? हे सगळं आपण एका प्राण्याच्या उदाहरणावरून बघूया. मागे एकदा कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिमेकडे असलेल्या जंगलातील ओढय़ामध्ये एका बिबट्याने आपली पिल्ले ठेवलेली होती. तिथे जंगलाला वणवा लागला (म्हणजेच कोणीतरी पेटवलं) मग ती बिबट्याची पिल्ले जीव वाचविण्यासाठी सैरावैरा पळाली. त्यामुळे त्या पिल्लांचा शोध घेण्यासाठी बिबट्या जवळच्या गावात आला व त्याने अनेकांवर हल्ला केला, अनेकांची जनावरे फस्त केली.
एकीकडे आपल्यातलीच काही लोकं जाणते-अजाणतेपणी सिगरेटी ओढून पेटवून टाकतात व शेकोटी,पार्टी, चूल, काडीपेटी, माचीस अशा येनकेनप्रकारे जंगलं पेटवतात. दुसरीकडे आपण सर्वजण निसर्ग जपणारी माणसं पर्यावरण दिनाचे औचित्य साधून हजारो, लाखो झाडे लावून जोरात वृक्षारोपण करतो. पण आपले प्रयत्न जंगलं पेटवणाऱ्यांच्यापुढे तोकडे पडतात. कारण मित्रांनो हे खरंच इतकं सोपं नाहीय सगळं. वृक्षारोपण केलं म्हणजे जंगल झालं का तयार? आपण जंगल तयार करू शकत नाही. जंगल तयार होणे ही खूप मोठी गोष्ट आहे. एक भरगच्च व घनदाट जंगल तयार व्हायला कमीतकमी हजारो वर्षांचा कालावधी लागतो.
म्हणूनच जंगलं जाळणाऱ्यांना आपण सर्वांनी खडसावून हे लक्षात आणून दिले पाहिजे की, जंगल परत तयार करणं, वनीकरण करणं आपल्याला शक्य नाहीय. आपण फार फार तर वृक्षारोपण करू शकतो. उद्या भविष्यात कित्येक पिढ्यांना आजच्या वृक्षारोपणाचा फायदा होईलच पण आपला आजचा वर्तमान आपण जंगलाबरोबर जाळत आहोत हे मात्र नक्की. आज जेवढे जंगल आपल्या हातात शिल्लक आहे त्याची जपणूक करून आपला वर्तमान “समृद्ध” करणे एवढेच आपल्या हातात आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728