विद्यार्थ्यांनी स्वतःचा सर्वांगीण विकास करत समाजहित जपले पाहिजे : प्राचार्य संजय कुंभार, मेन राजाराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न
|
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
विद्यार्थ्यांनी स्वतःचा सर्वांगीण विकास करत समाजहित जपले पाहिजे : प्राचार्य संजय कुंभार
मेन राजाराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न 
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
विद्यार्थ्यांनी शालेय वयात स्वयंशिस्त, चिकाटी, मेहनत कष्ट यांच्या जोरावर यश संपादन करून स्वतःचा सर्वांगीण विकास करत समाजहित जपले पाहिजे, असे मत महाराणी राधाबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाला, गडहिंग्लजचे प्राचार्य संजय कुंभार यांनी प्रतिपादन केले. जिल्हा परिषद, कोल्हापूर संचलित मेन राजाराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या वार्षिक बक्षीस वितरण व स्नेहसंमेलन कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
लोकनियुक्त सरपंच, माजी उपप्राचार्य बी.सी.कदम यांनी विद्यार्थी शारीरिकदृष्ट्या सक्षम, सदृढ असेल तर बौद्धिकदृष्या तो परिपक्व होईल. यासाठी योग्य आहार, विहार, व्यायाम व स्वयंशिस्तीची गरज आहे. निखळ खेळातून खिलाडूवृत्ती, सहकार्य वृत्ती वाढीस लागते.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य विजय डोणे यांनी आपल्या अंतरंगातील कलागुणांना वाव दिला तर आपली जडणघडण गुणवत्तापूर्ण होईल.
यावेळी शासकीय राज्यस्तरीय स्पर्धेतील अथर्व शिंदे, आर्या पाटील, आदेश सातपुते, महेश्वरी पाटील, काजल यादव, अर्पिता चौगुले, शिवराज खोमकर, अथर्व मोरे, उज्मा सिंधी या विजेत्या खेळाडूबरोबर कबड्डी, हाॅलीबाॅल, धावणे, लांब उडी, गोळाफेक, थाळीफेक, बॅडमिंटन, बुद्धीबळ या खेळातील विद्यार्थाना बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. माध्यमिक विभागातून अथर्व शिंदे, उच्च माध्यमिक विभागातून आर्या अरूण पाटील यांना या वर्षीचा आदर्श विद्यार्थी म्हणून सन्मानित करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी गणेशस्तवन, कोळीगीत गोंधळगीत, लावणी, विविधतेतून एकता, जोगवा असा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर केला.
पाहुण्यांची ओळख व स्वागत उपप्राचार्य डॉ गजानन खाडे, प्रास्ताविक प्रा.बाबुराव यादव, प्रमाणपत्र वाचन माध्यमिक विभाग एस व्ही पत्रावळे, उच्च माध्यमिक विभागाचे प्रा.सपना माने यांनी केले. सुत्रसंचालन प्रा. सुषमा पाटील, प्रा.सपना माने व आभार प्रा. राहूल देशमुख यांनी मानले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सुषमा मोरे, एम आर हायस्कूल गडहिंग्लजचे प्रा विनायक शिंदे, प्रा. वनिता खडके, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा बाबासाहेब माळवे, प्रा हर्षवर्धन काटकर, प्रा विकास पाटील, प्रा भाऊसाहेब धराडे, प्रा दिपा लोहार, सौ एच जे पठाण, सौ डी पी पाटील, कु आश्वीनी वडर, वरिष्ठ लिपिक प्रिया पुजारी, संगिता चव्हाण, राजू मोरे, प्रफुल्ल कदम, निलेश साळुंखे, पालक, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा





