नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , वाचन प्रोत्साहन व शालेय ग्रंथालय समृद्धीसाठी हायस्कूल्स, वाचनालयांना “ग्रंथदान” करून नववर्षाचे स्वागत : जीवन साळोखे यांच्या उपक्रमास अठरा वर्षे पूर्ण – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

वाचन प्रोत्साहन व शालेय ग्रंथालय समृद्धीसाठी हायस्कूल्स, वाचनालयांना “ग्रंथदान” करून नववर्षाचे स्वागत : जीवन साळोखे यांच्या उपक्रमास अठरा वर्षे पूर्ण

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

वाचन प्रोत्साहन व शालेय ग्रंथालय समृद्धीसाठी हायस्कूल्स, वाचनालयांना “ग्रंथदान” करून नववर्षाचे स्वागत : जीवन साळोखे यांच्या उपक्रमास अठरा वर्षे पूर्ण

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, मुरगूड
गेली अनेक वर्षे वाचन संस्कृतीची वाढ आणि वाचक संस्थेच्या मजबुतीसाठी हजारो पुस्तकांचे सातत्याने दान करत असलेल्या ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक जीवन साळोखे यांनी नवीन वर्षाचे (२०२४) स्वागत जिल्ह्यातील विविध हायस्कूल्स आणि शासनमान्य वाचनालयांना दोन हजारांहून अधिक उत्तमोत्तम पुस्तके देऊन करणार असल्याचे जाहीर केले आहे.
वाचन प्रोत्साहन व शालेय ग्रंथालय समृद्धीसाठी ग्रंथदान करून, वाचन चळवळ गतीमान करण्यासाठी निवृत्त प्राचार्य जीवन साळोखे यांच्या २००६ पासून एकहाती अखंड सुरू असलेल्या ग्रंथदान उपक्रमास अठरा वर्षे पूर्ण होत आहेत.
२०२४ या आगामी वर्षांत प्राचार्य जीवन साळोखे हे चंदगड, राधानगरी, करवीर, शिरोळ, हातकणंगले, कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या शंभर शालेय ग्रंथालय व सार्वजनिक वाचनालयांना समारंभपूर्वक ग्रंथभेट देणार आहेत.
दरम्यान शाळा-शाळांमधून “ग्रंथदान” हा उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना वाचते करण्यासाठी शिक्षक-मुख्याध्यापकांसह सर्वांनी प्रयत्न करावेत, तसेच पालक वर्ग आणि समाजातील मान्यवरानीही ग्रंथदान उपक्रमास सहकार्य करावे असेही आवाहन प्राचार्य जीवन साळोखे यांनी यासंदर्भात बोलताना केले आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728