नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , पोलीस वर्धापन दिनाच्या निमित्त गारगोटी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची पोलीस ठाण्यास भेट : विद्यार्थ्यांनी घेतली पोलीस दलाची माहिती – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

पोलीस वर्धापन दिनाच्या निमित्त गारगोटी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची पोलीस ठाण्यास भेट : विद्यार्थ्यांनी घेतली पोलीस दलाची माहिती

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

पोलीस वर्धापन दिनाच्या निमित्त गारगोटी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची पोलीस ठाण्यास भेट : विद्यार्थ्यांनी घेतली पोलीस दलाची माहिती

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
गारगोटी हायस्कूल व श्री. समर्थ कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पोलीस वर्धापन दिनाच्या निमित्ताने भुदरगड पोलीस ठाण्यास भेट देऊन पोलीस दलाची माहिती घेतली. यावेळी पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी विद्यार्थ्यांना माहिती देऊन त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.
पोलीस वर्धापन दिनाच्या निमित्ताने विद्यार्थी, नागरिकांना पोलीस दलाची माहिती होऊन त्यांच्यामध्ये विश्वास व सुरक्षीततेची भावना निर्माण होण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी विद्यार्थ्यांना पोलीस ठाण्याच्या कामकाज तसेच वाहतुकीचे नियम, खबरदारी, सुरक्षा याबाबतची माहिती दिली. शस्त्रांची माहिती देऊन शस्त्रे हाताळण्यास दिली. यावेळी पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के, पोलीस उपनिरीक्षक जीवन पाटील, पोलीस कॉन्स्टेबल सतीश पाटील, संदेश कांबळे, राहुल पाटील आदींनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. यावेळी जेष्ठ शिक्षक डॉ. आर. डी. पोवार, श्री. आर.पी.गव्हाणकर यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031