नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , डिजिटल मिडियाच्या कोल्हापूर अधिवेशनात अजितदादांची प्रकट मुलाखत होणार : २९ जानेवारीला कणेरी मठ येथे अधिवेशन – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

डिजिटल मिडियाच्या कोल्हापूर अधिवेशनात अजितदादांची प्रकट मुलाखत होणार : २९ जानेवारीला कणेरी मठ येथे अधिवेशन

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

डिजिटल मिडियाच्या कोल्हापूर अधिवेशनात अजितदादांची प्रकट मुलाखत होणार : २९ जानेवारीला कणेरी मठ येथे अधिवेशन

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, मुंबई
डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना, महाराष्ट्रचे दुसरे अधिवेशन सिध्दगिरी मठ, कणेरी (कोल्हापूर) येथे २९ जानेवारी रोजी होत आहे. अधिवेशनाच्या समारोप सोहळ्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नाम.अजितदादा पवार यांची प्रकट मुलाखत होणार असल्याची माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी येथे दिली.
उपमुख्यमंत्री अजितदादा यांची प्रकट मुलाखत मराठी चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम कलाकार घेणार असून त्या कलावंताचे नाव लवकरच जाहीर केले जाईल.
राजा माने यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अजित पवार यांची त्यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी भेट घेवून त्यांना निमंत्रण दिले. या शिष्टमंडळात मुंबईचे अध्यक्ष संजय भैरे व ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रफुल्ल वाघुले यांचा समावेश होता. उपमुख्यमंत्री पवार यांनी निमंत्रण स्वीकारले व प्रकट मुलाखतीसही अनुमती दिली आहे. कोल्हापूर येथील सिध्दगिरी कणेरी मठ येथे होत असलेल्या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष तसेच “मित्र”या शासन अंगिकृत उपक्रमाचे उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर आहेत. संघटनेचे पहिले ऐतिहासिक अधिवेशन सातारा जिल्ह्यात जागतिक किर्तीचे पुस्तकांचे गाव भिलार महाबळेश्वर येथे पार पडले होते.
……..
फोटो ओळ : डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रच्या कोल्हापूर येथील सिध्दगिरी मठ येथे असलेल्या दुसऱ्या अधिवेशनाचे निमंत्रण राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना देताना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने.सोबत मुंबई अध्यक्ष संजय भैरे व ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रफुल्ल वाघुले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031