गारगोटी हायस्कूलमध्ये बालसभा संपन्न : विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
|
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
गारगोटी हायस्कूलमध्ये बालसभा संपन्न : विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग 
गारगोटी प्रतिनिधी
गारगोटी हायस्कूल व श्री. समर्थ कनिष्ठ महाविद्यालय येथे बालसभा संपन्न झाली. या बालसभेत मुला-मुलींनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन सर्व कामकाज पूर्ण केले. या बालसभेचे प्रमुख पाहुण्या म्हणून इ.६ वी ‘ब’च्या कु.सान्वी कुलकर्णी या विद्यार्थिनीने स्वीकारले. अध्यक्षस्थानी कु.आर्या मोरस्कर होती.
प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन प्राचार्य मिलिंद पांगिरेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कु.समिक्षा सावंत, कु.अनुष्का जगताप, साईराज पाटील, रागिणी खोत, वेदिका देसाई, देवयानी सुतार, स्वरा चव्हाण, केतकी कांबळे यांनी म. फुले, सावित्रीबाई फुले, डॉ बाबासाहेब आबेडकर, म.गांधी यांच्याविषयी माहिती सांगितली. आदित्य देसाई याने डॉ. बाबासाहेबांविषयी कविता सादर केली. कु.सान्वी कुलकर्णी हीने आपले मनोगत व्यक्त केले व सावित्रीबाई फुले यांच्या विषयी कविता सादर केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षा कु.आर्या मोरस्कर हिने ‘मी सावत्रीबाई फुले ही कथा सादर केली.
यावेळी श्रीमती आर. आर.बहादूरे, श्री. एस. एस.नाईक, श्री. बी. के.इंगळे, श्री.एस. एम.साळवी व सौ. सुजाता पाटील आदी उपस्थित होते. प्रारंभी प्रास्ताविक कु.संस्कृती भोपळे हिने, आभार सुयश जाधव याने मानले. तर सुत्रसंचलन कु.सायली पोवार हिने केले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा





