नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , आयुष्य सर्वांगसुंदर बनण्यास युवतींसाठी वाचन हाच राजमार्ग : ज्येष्ठ साहित्यिक जीवन साळोखे यांचे प्रतिपादन – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

आयुष्य सर्वांगसुंदर बनण्यास युवतींसाठी वाचन हाच राजमार्ग : ज्येष्ठ साहित्यिक जीवन साळोखे यांचे प्रतिपादन

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

आयुष्य सर्वांगसुंदर बनण्यास युवतींसाठी वाचन हाच राजमार्ग : ज्येष्ठ साहित्यिक जीवन साळोखे यांचे प्रतिपादन

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, राधानगरी
वाट्याला आलेले आयुष्य सर्वांगसुंदर बनवण्यासाठी युवतींना वाचन हाच राजमार्ग आहे. अभ्यासक्रमाशिवाय योग्य पध्दतीने पूरक अवांतर वाचन केल्याने व्यक्तिमत्व विकास होतो. अवतीभवतीच्या समाजात वाढणाऱ्या उथळ, सवंग जीवनशैली रोखण्यास युवतींनी पुढाकार घ्यावा. हाच आजच्या राष्ट्रीय युवादिनाचा खरा संदेश आहे. असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार जीवन साळोखे यांनी केले.
तिटवे (ता.राधानगरी) येथील शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयात स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त आयोजित “राष्ट्रीय युवा दिन” कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत पालकर होते. यावेळी मुरगूडचे प्रमुख कार्यकर्ते माजी नगरसेवक विशाल सूर्यवंशी, उपप्राचार्य सागर शेटगे, पत्रकार राजेंद्र मकोटे, प्रा.शुभांगी भांदिगरे, संग्राम किल्लेदार आदी प्रमुख उपस्थित होते.
यावेळी विविध उदाहरणे आणि दाखले देऊन प्राचार्य जीवन साळोखे यांनी वाचनाचे महत्त्व सविस्तर विशद केले. ते म्हणाले, “शरीराच्या वाढीसाठी जसे अन्न महत्त्वाचे, तसेच मानसिक, भावनिक भरण पोषणासाठी आणि मन- मेंदू सदैव सक्षम राहण्यासाठी युवापिढीस वाचनच उपयुक्त ठरणार आहे.” असे सांगून ते म्हणाले, युवावस्थाच जीवनाची दिशा आणि दशा ठरवते. सध्याच्या भांबावलेपणाच्या वातावरणात, आयुष्याचा पाया योग्य वाचनातून भक्कम केला, तरच तरुणाईचा विकास होईल अन्यथा ते भकास होईल , असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. राजमाता जिजाऊ मॉॅ साहेब आणि स्वामी विवेकानंदांच्या आयुष्यातील अनेक प्रसंग सांगून त्यांनी उपस्थित युवतींना भारावून टाकले.
यावेळी साहित्यिक जीवन साळोखे यांनी वाचन प्रोत्साहनासाठी ग्रंथदान या आपल्या ग्रंथदान उपक्रमांतर्गत शहीद महाविद्यालयास दोन हजार रुपयाची पंधरा पुस्तके, ग्रंथालय शास्त्राचे जनक डाॅ.एस.आर.रंगनाथन यांचा फोटो प्राचार्य पालकर यांचेकडे भेट दिला.
यावे॓ळी पत्रकार राजेंद्र मकोटे यांनी प्रमुख वक्त्यांची ओळख करून दिली. प्रा.दिग्विजय कुंभार यांनी समारोप केला. सूत्रसंचालन कु. तेजस्विनी परबकर हिने केले . महाविद्यालयाच्या मास मिडिया, एन.एस.एस. विभागाने या कार्यक्रमाचे नेटके आयोजन केले होते. यावेळी मोठ्या संख्येने महाविद्यालयीन युवती उपस्थित होत्या.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728