नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , शिवाजी विद्यापीठांतर्गत ज्युदो स्पर्धेत आबिटकर महाविद्यालयाचा विद्यार्थी हर्षवर्धन गाडेकर यास गोल्डमेडल : राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

शिवाजी विद्यापीठांतर्गत ज्युदो स्पर्धेत आबिटकर महाविद्यालयाचा विद्यार्थी हर्षवर्धन गाडेकर यास गोल्डमेडल : राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

शिवाजी विद्यापीठांतर्गत ज्युदो स्पर्धेत आबिटकर महाविद्यालयाचा विद्यार्थी हर्षवर्धन गाडेकर यास गोल्डमेडल : राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कडगाव
कडगाव (ता.भुदरगड) येथील श्री.आनंदराव आबिटकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी कु.हर्षवर्धन संजय गाडेकर (बी.एस्सी.भाग -2) याने शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर अंतर्गत इंटर झोनल ज्युदो स्पर्धेत (८१ किलो वजन गट) ‘गोल्डमेडल’ मिळवले. कु.हर्षवर्धन गाडेकर याची ‘वेस्ट झोन’ मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे..
कु.हर्षवर्धन संजय गाडेकर यास युवा ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य अर्जुन आबिटकर यांचे प्रोत्साहन, प्रभारी प्राचार्य गुरुप्रसाद शेणवी तसेच क्रिडाशिक्षक व इतर शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. कु.गाडेकर याचा सत्कार प्राचार्य अर्जुन आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी युवा नेते संजय गाडेकर, प्र.प्राचार्य गुरुप्रसाद शेणवी, माजी ग्रामपंचायत सदस्य रणधीर शिंदे, श्री.नारायण निकम आदी उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031