आचार्य जावडेकर शिक्षणशास्त्र महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न
|
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
आचार्य जावडेकर शिक्षणशास्त्र महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
श्री.मौनी विद्यापीठ संचलित आचार्य जावडेकर शिक्षणशास्त्र महाविद्यालयात राजमाता जिजाऊ जयंती, स्वामी विवेकानंद जयंती, युवा दिन व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संयुक्तरित्या साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी श्री.मौनी विद्यापीठाचे चेअरमन मधुआप्पा देसाई होते. तर व्याख्याते संजय खोचारे प्रमुख उपस्थित होते.
प्रारंभी प्रास्ताविक प्राचार्या डॉ.पी.एस.देसाई यांनी केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते भित्तीपत्रके व शैक्षणिक साधन प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
दुधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल मधुकर (आप्पा) देसाई यांचा सत्कार करण्यात आला. तसेच बी.एड २०२१-२३ या बॅचमधील उज्वल यश संपादन केलेल्या प्रशिक्षणार्थींचा गुणगौरव करण्यात आला. यामध्ये सोनाली कदम, शैलजा पाटील, पल्लवी महाडिक, निलम पाटील, ऋतुजा बिरंबोळे यांना सन्मानित करण्यात आले. तसेच आदर्श विद्यार्थी हा पुरस्कार प्रथमेश पाटील यांना देण्यात आला.
व्याख्याते संजय खोचारे यांनी युवा शक्ती हीच राष्ट्रशक्ती असल्याचे मत व्यक्त करून उपस्थितांना बहुमोल असे मार्गदर्शन केले. अध्यक्षीय मनोगतात चेअरमन मधूआप्पा देसाई यांनी महाविद्यालयाच्या गुणवत्तेबद्दल समाधान व्यक्त करत सर्व विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले. यावेळी डॉ.आर.के.शेळके, प्रा.एन.व्ही.पाटील, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आदींसह प्रथम व द्वितीय वर्षांचे प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. आभार डॉ.पी.बी.दराडे यांनी मानले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा





