नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , स्त्रीचा आदर सत्कार करून तिला जगण्यासाठी प्रोत्साहित करा : प्रा.सुषमा पाटील – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

स्त्रीचा आदर सत्कार करून तिला जगण्यासाठी प्रोत्साहित करा : प्रा.सुषमा पाटील

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

स्त्रीचा आदर सत्कार करून तिला जगण्यासाठी प्रोत्साहित करा : प्रा.सुषमा पाटील

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
स्त्री ही पुरूषाची जीवन साथी, धर्माची रक्षक तर संसाराची गृहलक्ष्मी आहे. ती कुटुंब व्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे अशा स्त्रीचा नेहमी आदर सत्कार करून तिला जगण्यासाठी प्रोत्साहित करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मेन राजाराम कॉलेज, कोल्हापूरच्या प्राध्यापिका सुषमा पाटील यांनी व्यक्त केले.
ग्रामपंचायत मडिलगे खुर्द (ता.भुदरगड ) येथील स्व.प्रा.रमेश दळवी (सर) बहुउद्देशीय सामाजिक संस्था, बसरेवाडी यांच्या वतीने आयोजित केलेल्या महिला मेळावा व आरोग्य विषयक बोलत होत्या. महिला सक्षमीकरण हा त्यांच्या व्याख्यानाचा मूळ विषय होता. अध्यक्षस्थानी लोकनियुक सरपंच कृष्णात मांडे होते.
प्रा.सुषमा पाटील पूढे म्हणाल्या, बाईच्या जगण्यात अनेक रुढी, तीच्या अस्तित्वात जखमा, पदराला फाटक आभाळ, आणि परंपरेला छेद देत, प्रसंगी जुन्या रूढी परंपरा जतन करत तिची वाटचाल सुरु असते. स्त्री ही शक्ती आहे आणि शक्ती ही शिव आहे. या शक्तीविना शीव हा शव आहे. त्यामुळे आजच्या स्त्रीकडे नम्रतेने पहाण्याची वृत्ती ठेवा. तरच जगण सहज शक्य आहे. अन्यथा संघर्ष हा करावाच लागेल. यामध्ये यावर्षी जन्म झालेल्या मुलींच्या नावे ११०० रुपये व लग्न झालेल्या मुलींच्या नावे ११०० रुपये ग्रामपंचायतने दिले. तसेच गावातील मयत व्यक्तीच्या अंत्यविधीचे साहित्य ग्रामपंचायती मार्फत पुरविण्यात येते याविषयी सर्वानी समाधान व्यक्त केले
लोकनियुक्त सरपंच मा कृष्णात मांडे, उपसरपंच श्रीपती कल्याणकर, ग्रामसेवक एस.डी.भारमल, कै प्रा रमेश दळवी (सर) बहुउद्देशीय सामाजिक संस्था,बसरेवाडीचे अध्यक्ष संदिप दळवी, ग्रामपंचायत सदस्या पल्लवी पाटील, सुनिता फडणवीस, शुभांगी बिरंबोळे,वासंती अकोळकर, स्वप्नील पाटील , नामदेव परीट,आक्काताई मांडे, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सुत्रसंचलन पल्लवी पाटील यांनी तर आभार संदिप दळवी यांनी मानले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728