नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारासाठी कादंबरी, कथासंग्रह व बालसाहित्य पाठविण्याचे लेखक बा.स.जठार यांचे आवाहन – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारासाठी कादंबरी, कथासंग्रह व बालसाहित्य पाठविण्याचे लेखक बा.स.जठार यांचे आवाहन

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारासाठी कादंबरी, कथासंग्रह व बालसाहित्य पाठविण्याचे लेखक बा.स.जठार यांचे आवाहन

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारासाठी लेखक व प्रकाशक यांचेकडून पुस्तके मागवणेत येत आहेत. कादंबरी, कथासंग्रह व बालसाहित्य या तीन साहित्य प्रकारांना हे पुरस्कार दिले जाणार आहेत. अशी माहिती लेखक बा.स.जठार यांनी दिली.
राज्यस्तरीय उत्कृष्ट कादंबरी पुरस्कारासाठी अनुक्रमे कै.सदाशिव धों. जठार यांचे स्मरणार्थ (₹ 2001, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह), कै.आकुबाई स. जठार यांचे स्मरणार्थ (₹ 1501, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह) तर दोन विशेष पुरस्कार (शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह)
राज्यस्तरीय उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कारासाठी अनुक्रमे कै.यशवंत आ. इंदुलकर यांचे स्मरणार्थ (₹ 2001, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह), कै.सरस्वती य. इंदुलकर यांचे स्मरणार्थ (₹ 1501, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह) तर दोन विशेष पुरस्कार (शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह)
राज्यस्तरीय उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कारासाठी अनुक्रमे कै.दत्तात्रय स. जठार यांचे स्मरणार्थ (₹ 1001, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह), तातोबा द. पोवार यांचे स्मरणार्थ (₹ 1001, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह), आकुबाई स. जठार यांचे स्मरणार्थ (₹ 1001, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह) तर तीन विशेष पुरस्कार (शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह) देण्यात येणार आहेत.
राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण २० मे रोजी होईल. तरी लेखक, प्रकाशक यांनी १ जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत प्रकाशित झालेल्या पुस्तकांच्या दोन प्रती व लेखकाचा अल्पपरिचय दि.१५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत पोहोचतील अशा रितीने सौ. रंजना बा. जठार, विद्यासागर निवास, शिंदेवाडी रोड, गारगोटी, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर – 416209 या पत्यावर पाठवाव्यात. असे आवाहन लेखक बा. स. जठार (मो. नं. 9850393996, 9420436256) यांनी केले आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031