नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , महाराष्ट्राची पुरोगामी, प्रागतिक विचारधारा ” ही जीवन साळोखे यांच्या आठ पुस्तकांची, थोर समाजसुधारकांची चरित्रमाला प्रसिद्ध – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

महाराष्ट्राची पुरोगामी, प्रागतिक विचारधारा ” ही जीवन साळोखे यांच्या आठ पुस्तकांची, थोर समाजसुधारकांची चरित्रमाला प्रसिद्ध

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

महाराष्ट्राची पुरोगामी, प्रागतिक विचारधारा ” ही जीवन साळोखे यांच्या आठ पुस्तकांची, थोर समाजसुधारकांची चरित्रमाला प्रसिद्ध

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, मुरगूड
ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार जीवन साळोखे यांची “महाराष्ट्राची पुरोगामी, प्रागतिक विचारधारा” ही थोर समाजसुधारक, विचारवंतांची आठ भागांची संक्षिप्त चरित्रमाला नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. कोल्हापूर येथील श्री शब्द प्रकाशन यांनी ही आठ भागांची चरित्रमाला आकर्षक स्वरूपात प्रकाशित केली असून, नामवंत प्रकाशक अभिनंदन प्रकाशन, कोल्हापूर हे या चरित्रमालेचे मुख्य वितरक आहेत.
महाराष्ट्रातील तेराव्या शतकातील संत ज्ञानेश्वर, नामदेव,एकनाथांसह संत तुकाराम व रामदास या पाच प्रमुख संतांसह एकोणीसाव्या आणि विसाव्या शतकातील निवडक अडतीस प्रमुख समाजसुधारक व विचारवंतांच्या संक्षिप्त चरित्रांचा या आठ पुस्तकात समावेश आहे. प्रामुख्याने कुमारवयीन विद्यार्थी वाचकांसह नव्या पिढीतील तरूण चौकस वाचकांना ही चरित्रमाला निश्चित उपयुक्त ठरेल असा विश्वास या चरित्रमालेचे प्रमुख वितरक अभिनंदन बुक डेपो,कोल्हापूर चे त्रिभुवननाथ जोशी यांनी व्यक्त केला.
या आठ पुस्तकांच्या चरित्रमालेचे लेखक जीवन साळोखे यांच्या यापूर्वीच्या सर्वच पुस्तकांना आजपर्यंत, वेळोवेळी मोठा प्रतिसाद मिळाला असून त्यांच्या बहुतेक पुस्तकांच्या अनेक आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या आहेत.
दरम्यान, वाचन प्रोत्साहन व समृद्ध शालेय ग्रंथालय यासाठी “ग्रंथदान ” या आपल्या उपक्रमांतर्गत गेल्या अठरा वर्षांत सुमारे तेरा हजार पुस्तके जीवन साळोखे यांनी जिल्ह्य़ातील विविध हायस्कूल्स, वाचनालयांना,विद्यार्थ्यांसह अनेकांना भेट म्हणून दिली आहेत.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728