नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , कै.दिलीप कारेकर यांच्या शैक्षणिक कार्याची प्रेरणादायी माहिती ‘स्मृतीगंध’ मध्ये संकलित : गारगोटीत ‘स्मृतीगंध’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

कै.दिलीप कारेकर यांच्या शैक्षणिक कार्याची प्रेरणादायी माहिती ‘स्मृतीगंध’ मध्ये संकलित : गारगोटीत ‘स्मृतीगंध’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

कै.दिलीप कारेकर यांच्या शैक्षणिक कार्याची प्रेरणादायी माहिती ‘स्मृतीगंध’ मध्ये संकलित : गारगोटीत ‘स्मृतीगंध’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
गारगोटीत ‘स्मृतीगंध’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. अध्यक्षस्थानी ए. बी. पाटील होते. ‘स्मृतीगंध’ पुस्तकाचे संकलन श्रीमती दिपा कारेकर यांनी केले आहे. प्रकाशन सोहळा जेष्ठ नागरिक संघाच्या मा. आर. एन कारखानीस सभागृहात संपन्न झाला.
कै.दिलीप कारेकर हे कुंभवडे (जि. रत्नागिरी) शाळेचे मुख्याध्यापक, आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते शिक्षक होते. त्यांच्या आठवणी, त्यांनी केलेले शैक्षणिक कार्य, शिक्षण क्षेत्रातील विविध प्रयोग, गुरुकूलमध्ये केलेल्या नाविण्यपूर्ण उपक्रमाची माहीती या पुस्तकात संक्षिप्त स्वरूपात मांडली आहे. एक वर्षापूर्वी कै.दिलीप कारेकर यांचे निधन झाले. त्यांनी शिक्षण क्षेत्रात केलेले हे अतुलनीय कार्य नव्या पिढीपर्यंत पोहचावे. शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या लोकांना प्रेरणा मिळावी या हेतूने त्याच्या पत्नी श्रीमती दिपा कारेकर यांनी या पुस्तकाचे संकलन केले आहे.
या पुस्तक प्रकाशन प्रसंगी अँड.अरुण पनदुरकर मा. श्रीमती सुगंधा सावंत, दिपक बेलवलकर, बी. बी. सोळसे, प्राचार्य बी. एस. माने, संजय मालडकर, श्री.मेटे, श्री.मारुती टिपुगडे, रमेश कारेकर यांच्यासह जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी प्रास्ताविक तृप्ती महाजन यांनी आभार कुलभूषण कारेकर यानी मानले

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031