कर्तृत्ववान माणसांचा आदर्श नव्या पिढीसमोर ठेवण्यासाठी ज्येष्ठ नागरिक संस्थेचा प्रयत्न कौतुकास्पद : आमदार सतेज पाटील
|
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
कर्तृत्ववान माणसांचा आदर्श नव्या पिढीसमोर ठेवण्यासाठी ज्येष्ठ नागरिक संस्थेचा प्रयत्न कौतुकास्पद : आमदार सतेज पाटील
‘भुदरगड भूषण’ व ‘आदर्श माता’ पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
समाजातील कर्तृत्ववान माणसांचा आदर्श नव्या पिढीसमोर ठेवण्यासाठी, ज्येष्ठ नागरिक संस्थेने पुरस्काराच्या निमित्ताने केलेला प्रयत्न कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन श्री.मौनी विद्यापीठाचे अध्यक्ष माजी मंत्री, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी केले.
तुलसी लॉन मंगल कार्यालय, गारगोटी येथे भुदरगड ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्थेच्या वतीने देण्यात येणाऱ्या भुदरगड भूषण व आदर्श माता पुरस्कार प्रदान सोहळ्यात माजी मंत्री, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार प्रकाश आबिटकर होते. यावेळी ‘भुदरगड भूषण’ पुरस्कार माजी आमदार श्री.बजरंग आनंदराव देसाई (आण्णा) यांना तर ‘आदर्श माता’ पुरस्कार श्रीमती नलिनी काकासाहेब देसाई (म्हसवे) यांना प्रदान करण्यात आला.
यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील म्हणाले, आयुष्यात प्रचंड कष्टानं आणि स्वकर्तृत्वाने माजी आमदार बजरंग देसाई (आण्णा) यांनी राजकारण, समाजकारण केले. तसेच क्रांतिवीर काकासाहेब देसाई यांना साथ सोबत देत कुटूंबाला उभा करण्याचा श्रीमती नलिनी देसाई (काकी) यांनी केलेला प्रयत्न आदर्शवत आहे.
यावेळी बोलताना आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, आम्ही लहान असल्यापासून माजी आमदार बजरंगआण्णा देसाई यांच कार्य जवळून बघत आलो आहोत. त्यांचं राजबिंड व्यक्तिमत्व, सत्ता असो वा नसो निष्ठावान कार्यकर्त्यांच त्यांच्या सभोवताली असलेलं जाळ आणि कार्यकर्त्यांवर असलेलं त्यांच प्रेम हे उल्लेखनीयच आहे. हा आदर्श आमच्या पिढीने घ्यायला हवा. तसेच स्वातंत्र्यसैनिक, माजी आमदार काकासाहेब देसाई यांच्या सारख्या कणखर व्यक्तिमत्वाबरोबर संसार करत असताना कुटूंबातील मुलांच्या शिक्षणासाठी नलिनी देसाई (काकी) यांनी केलेले प्रयत्न मोलाचे आहेत. समाजाचं देण लागतो या भावनेतून ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्थेने पुरस्काराच्या माध्यमातून केलेले प्रयत्न वाखाणण्यासारखा आहे.
याप्रसंगी श्रीमती नलिनी काकासाहेब देसाई, एआयसीटी, नवी दिल्लीचे चेअरमन प्रा. प्रताप देसाई, बिद्रीचे संचालक श्री.राहुल देसाई यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बिद्री कारखान्याचे माजी संचालक श्री. के. जी. नांदेकर, श्री. मौनी विद्यापीठाचे चेअरमन मधुकर देसाई (आप्पा), श्री. कारखानिस, जिल्हा बँकेचे संचालक प्राचार्य अर्जुन आबिटकर, ॲड.जयवंत देसाई, रणजित देसाई, गोकुळचे संचालक नंदकुमार ढेंगे, माजी संचालक धैर्यशील देसाई (दादा) गारगोटीचे सरपंच श्री. प्रकाश वास्कर, उपसरपंच सागर शिंदे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्री. शामराव देसाई, भाजपचे जिल्हा संघटक श्री. नाथाजी तुकाराम पाटील, जीवन पाटील, सचिन घोरपडे, प्रवीणसिंह सावंत, विजय घोलपे आदी उपस्थित होते.
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष श्री.एम.आर. टिपुगडे यांनी, मानपत्र वाचन संस्थेचे उपाध्यक्ष श्री.ए.के. देसाई, श्री. एन. एस. कोकाटे यांनी वाचन केले. आभार प्रा.बी. बी. सोळसे यांनी तर सूत्रसंचालन टी. बी. पाटील यांनी केले. संयोजन संस्थेचे सचिव श्री.बी.एस.माने, खजानीस श्री.बी.ए.सदलगे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांनी यांनी केले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा





