मंडलिक महाविद्यालयाच्या तब्बल सहा एनसीसी कॅडेट्सची भारतीय सेना दलात यशस्वी निवड
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
मंडलिक महाविद्यालयाच्या तब्बल सहा एनसीसी कॅडेट्सची भारतीय सेना दलात यशस्वी निवड
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, मुरगुड
येथील सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयातील सहा कॅडेट्सची भारतीय सेना दलात निवड झाली. भारतीय सेनेकडून अलीकडेच अग्नीवीर पदासाठी परीक्षा घेण्यात आल्या होत्या. महाविद्यालयात एनसीसी विभाग सुरू होऊन अवघी पाच वर्षे झाली आहेत. या पाच वर्षात चालू वर्षातील सहा कॅडेट्ससह एकूण नऊ कॅडेट्स भारतीय सेनेमध्ये दाखल झाले.
अग्नीवीर पदासाठीच्या परीक्षेतून मंडलिक महाविद्यालयाच्या सहा कॅडेट्सची यशस्वी निवड झाली त्यामध्ये कॅडेट प्रथमेश आनंद मालवेकर, कॅडेट सौरभ रामचंद्र करडे, कॅडेट अभिजीत दिलीप खोत, कॅडेट संकेत बाजीराव मसवेकर, कॅडेट प्रथमेश जयवंत मगदूम आणि कॅडेट समर्थ रमेश वाईंगडे यांचा समावेश आहे.
या सर्व कॅडेट्सवर महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाकडून आणि मुरगूड परिसरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या कॅडेट्सना जय शिवराय एज्युकेशन सोसायटी, मुरगुडचे सेक्रेटरी व कोल्हापूर जिल्ह्याचे विद्यमान खासदार संजयदादा मंडलिक आणि महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष व मंडलिक युवा प्रतिष्ठानचे संस्थापक ॲड.वीरेंद्रसिंह मंडलिक यांची प्रेरणा मिळाली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. डी. कुंभार उपप्राचार्य डॉ. टी. एम. पाटील आणि एनसीसी विभाग प्रमुख लेफ्टनंट प्रा. विनोदकुमार अशोक प्रधान यांचे मार्गदर्शन लाभले.
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space