नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , जंगलांना वणवे लावायचे थांबवले तरच वन्यप्राणी मानवी वस्ती, शेतात धाव घेणार नाहीत, त्यासाठी जंगलांना आगी लावणाऱ्यांनी जैवविविधता जपायला हवी : पर्यावरणमित्र अवधुत पाटील – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

जंगलांना वणवे लावायचे थांबवले तरच वन्यप्राणी मानवी वस्ती, शेतात धाव घेणार नाहीत, त्यासाठी जंगलांना आगी लावणाऱ्यांनी जैवविविधता जपायला हवी : पर्यावरणमित्र अवधुत पाटील

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

जंगलांना वणवे लावायचे थांबवले तरच वन्यप्राणी मानवी वस्ती, शेतात धाव घेणार नाहीत, त्यासाठी जंगलांना आगी लावणाऱ्यांनी जैवविविधता जपायला हवी : पर्यावरणमित्र अवधुत पाटील

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
जंगलामध्ये वन्यप्राणी, पशुपक्षी यांच्यासाठी बुजलेले झरे, पाणथळ जागा जिवंत केल्या किंवा पाणीसाठे उपलब्ध केले तरच पाण्याची वाणवा जाणवणार नाही. जंगलांना वणवे लावायचे थांबवल्यास वन्यप्राणी मानवी वस्ती, शेतशिवारात धाव घेणार नाहीत. त्यासाठी जंगलांना आगी लावणाऱ्यांनो, जैवविविधता जपा असे आवाहन पर्यावरणमित्र अवधुत पाटील यांनी केले आहे.
पावसाचा ओघ ओसरल्यानंतर विविध रंगांच्या पिवळ्या -निळ्या फुलांनी बहरलेली पठारे, डोंगर दऱ्या जणू पृथ्वीवरील स्वर्गच भासतात. चराचरात निसर्गाची मुक्तहस्ते उधळण होत असते. मन आनंदून जाते. मनाला उधाण येते अन..’हिरवे हिरवे गाल गालिचे..हरित तृणांच्या मखमालीचे’, नकळत ओठातून बाहेर पडते..हे फुलांच्या ताटव्यांनी भारलेले मखमली दिवस हवे हवेसे वाटणारे असेच,. हे दिवस संपू नये असे वाटतानाच गुलाबी थंडी सुरू होते,.अश्या बोचऱ्या थंडीत फुलांनी बहरलेल्या पठारावर मन पाखरू पाखरू फिरण्यात एक वेगळीच मजा अनुभूती येते,. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तर पूर्ण वाढ झालेलं गवत पिवळं हडुळ रखरखीत भासू लागतं,. गवत कापणीनंतर ही पठारे ओकीबोकी दिसू लागतात,. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस बोचरी थंडी काहीशी कमी होऊन झाडांच्या पानगळतीस सुरुवात होते,.निसर्गाचा हिरवा गालिचा ल्यायलेली लता वेली, झाडे झुडपे, जंगले बोडकी वाटू लागतात,. निसर्गाचे हे चक्र नित्यनियमाने सुरू असतं,.त्यात कोणतीही बाधा येत नाही.
अलीकडील काही वर्षामध्ये मानवाने आपल्या स्वार्थी हेतूपायी जंगल संस्कृतीत शिरकाव केलेलं पहायला मिळत आहे,.मौजमजा हा एकमेव हेतू ठेऊन, बेधुंदपणे वाहने चालवत जंगल सफारी करणारे तर विचारूच नका,.जंगल ह्यांच्या बापाच्या नावावर आहे असा अविर्भाव,. काय करतोय, कश्याशी खेळतोय याचा थांगपत्ता यांना नसतो,.बेदाद फिर्याद वाहने चालवताना, वाहनाखाली मुके असहाय वन्यजीव, सूक्ष्मजीव, सरपटणारे प्राणी चिरडले जातात,.जायबंदी होतात, जीवास मुकतात,. त्यांचं अश्या लोकांना देणंघेणं नसतं,. हा जंगल संस्कृतीतील शिरकाव नक्कीच आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यातला ठरतोय.
अश्यातच माही पौर्णिमा यात्रांच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात जंगलांना आगी वणवे लावले जातात,. फायद्या -तोट्याचा विचार न करता आगी लावून सडेच्या सडे आगीच्या खाईत लोटवले जातात,.अश्या बेअकली नतद्रष्ट लोकांच्या अट्टाहास मौजमजे पायी निसर्ग, जैवविविधता जळून बेचिराग होत आहे,.अश्या प्रऊतीच्या लोकांना जाब विचारायचा तरी कोणी ?.. आणि विचारलंच तर काहिकडे उत्तरेच नसतात,.तर काही लोकांची उत्तरे ऐकून धक्काच बसतो,.पण हे पूर्णतः चुकीचे आहे. अश्या चुकीच्या अपप्रुउत्तीमुळे जंगल संपत्तीचं विशेषतः जैवविविधतेचे अतोनात, न भरून निघणारे नुकसान होतेय,.आणखी हे भरून काढण्यासाठी पुढील येणारी कित्येक वर्षे खर्ची पडू शकतात,. त्यामुळे वेळीच अश्या बेजबाबदार गोष्टीना पायबंद घालावयास हवा.
जंगलामध्ये वन्यप्राणी, पशुपक्षी यांच्यासाठी बुजलेले झरे, पाणथळ जागा जिवंत केल्या किंवा पाणीसाठे उपलब्ध केले तर पाण्याची वानवा जाणवणार नाही, जंगलांना वणवे लावायचे थांबवल्यास वन्यप्राणी मानवी वस्ती शेताशिवारात धाव घेणार नाहीत,. ह्या सर्व गोष्टींच्या मुळाशी जाऊन मानवाने सखोल अभ्यास केल्यास, आपल्या आचरणात आमूलाग्र बदल करून वन्यप्राणी, पशु -पक्षी, जंगले, वृक्षसंपदा याबद्दल भूतदया दाखवल्यास हि हिरवीगच्च वनराई रुक्ष रुक्ष भासणार नाही,.अर्थात रखरखीत उन्हात मृगजळाचा भास जाणवणार नाही.

– अवधूत पाटील, पर्यावरणमित्र
भुदरगड नेचर क्लब

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728