नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , नामवंत लेखक कृष्णात खोत यांना ‘रिंगाण’ कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान : देशातील २४ प्रादेशिक भाषांसाठी साहित्य अकादमी पुरस्कार – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

नामवंत लेखक कृष्णात खोत यांना ‘रिंगाण’ कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान : देशातील २४ प्रादेशिक भाषांसाठी साहित्य अकादमी पुरस्कार

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

नामवंत लेखक कृष्णात खोत यांना ‘रिंगाण’ कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान : देशातील २४ प्रादेशिक भाषांसाठी साहित्य अकादमी पुरस्कार


ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
नामवंत लेखक व कादंबरीकार कृष्णात खोत यांना ‘रिंगाण’ कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला. ताम्रपत्र, शाल आणि रुपये एक लाख रोख रक्कम आणि असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ओडिसा राज्याच्या प्रख्यात साहित्यिक व प्रमुख पाहुण्या प्रतिभा राय यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. देशातील २४ प्रादेशिक भाषांसाठी साहित्य अकादमी साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आले.
या सोहळ्यात अध्यक्ष माधव कौशिक, उपाध्यक्ष श्रीमती कुसुम शर्मा तसेच सचिव, के. श्रीनिवासराव उपस्थित होते. देशातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च संस्था म्हणून नावलौकिक असणाऱ्या साहित्य अकादमीने, येथील कॉपर्निकसमार्ग स्थित साहित्य अकादमीच्या वर्ष २०२३ साठी साहित्य पुरस्कार सोहळा पार पडला.
साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत देशातील २४ प्रादेशिक भाषांसाठी साहित्य अकादमी साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आले.
कृष्णात खोत हे मूळचे निकमवाडी (ता.पन्हाळा) येथील रहिवाशी आहेत. पन्हाळा विद्यामंदिर येथे त्यांचे शिक्षण झाले आहे. सध्या ते कळे येथील कनिष्ठ महाविद्यालयात काम करतात. वैशिष्ट्यपूर्ण आणि प्रदेश समूहनिष्ठ कादंबरी लेखनाने ‘कादंबरीकार कृष्णात खोत’ म्हणून स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
‘रिंगाण’ या कादंबरीला मराठी भाषा करिता साहित्य अकादमी पुरस्कार २०२३ साठी श्री खोत यांना पुरस्कार प्रदान झाला. ‘रिंगाण’ ही एक थक्क करणारी कादंबरी आहे. जज्या कादंबरीमध्ये जंगलात राहणाऱ्या समुदायाच्या विस्थापित आयुष्याचे चित्रण आहे आणि या समुदायाला धरण बांधण्याच्या कामासाठी एका प्रतिकूल समुदायामध्ये पुनर्स्थापित करण्यात आलेले आहे. मानव आणि निसर्गातील नातेसंबंधांच्या इतिहासाचे हे निवेदन असून, स्वरक्षणासाठी मानवाने निसर्गाशी केलेल्या संघर्षाचा हा वास्तववादी इतिहास आहे. या कादंबरीतील नायक, देवप्पाचा वेदनादायी शोध मानवाच्या निसर्गाशी असलेल्या नात्यातील दृढता आणि संघर्ष रेखाटतो. मानवाच्या उद्धट पणामुळे आणि ताकदीमुळे कशी पर्यावरणीय आणि सामाजिक हानी झालेली आहे याचे अत्यंत महत्वपूर्ण विधान या कादंबरीत करण्यात आलेले आहे. भारतीय कादंबरी प्रकाराला मराठीतील ‘रिंगाण’ हे महत्वपूर्ण योगदान आहे. माणूस आणि पाळीव प्राणी यांच्यातील संबंधांचा एक अनोखा अनुबंध या कादंबरीतून अनुभवायला मिळतो.
याबरोबर ‘गावठाण’ (२००५), ‘रौंदाळा’ (२००८), ‘झड-झिंबड’ (२०१२), ‘धूळमाती’ (२०१४), ‘रिंगाण’ (२०१८) या त्यांच्या प्रकाशित कादंबऱ्या असून, या कादंबऱ्यांमधून बदलत्या ग्रामीण जीवनाचे वास्तव चित्रण केले आहे. याशिवाय ‘नांगरल्याविन भुई’ हे त्यांनी लिहिलेले ललित व्यक्तिचित्रण प्रकाशित झाले आहेत. गावसंस्कृती आणि बदलते खेड्यातील जीवनसंघर्ष त्यांच्या लिखाणाचा विषय आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728