नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , जिल्हास्तरीय इंडोरन्स स्केटिंग स्पर्धेमध्ये ज्ञानप्रबोधिनी स्केटिंग क्लबच्या खेळाडूंनी मारली बाजी – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

जिल्हास्तरीय इंडोरन्स स्केटिंग स्पर्धेमध्ये ज्ञानप्रबोधिनी स्केटिंग क्लबच्या खेळाडूंनी मारली बाजी

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

जिल्हास्तरीय इंडोरन्स स्केटिंग स्पर्धेमध्ये ज्ञानप्रबोधिनी स्केटिंग क्लबच्या खेळाडूंनी मारली बाजी

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
कोल्हापूर जिल्हा इंडोरेन्स स्केटिंग असोसिएशन यांच्यामार्फत जिल्हास्तरीय इंडोरन्स स्पीड स्केटिंग स्पर्धा संजीवन इंग्लिश मीडियम स्कूल स्केटिंग रिंक, रंकाळा, कोल्हापूर येथे घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत ज्ञानप्रबोधिनी स्केटिंग क्लबच्या कागल, मुरगुड, निपाणी, गारगोटी येथील शाखेच्या स्केटिंग खेळाडूंनी विविध गटांमध्ये बाजी मारली आहे.
या विद्यार्थ्यांचा सत्कार जयसिंगराव पार्क कागल येथे कागल नगरपरिषदेचे माजी नगरसेवक श्री. संजय चितारी, विराज सिटी, कागल येथे पोलीस उपनिरीक्षक श्री. रविकांत गच्चे, तर म.फुले सदन, गारगोटी येथे शाहू कुमार भवनचे माजी मुख्याध्यापक तसेच श्री.मौनी विद्यापीठाचे माजी सदस्य व्ही.जे.कदम यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन करण्यात आला. यावेळी खेळाडू तसेच मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.
या स्पर्धेत ज्ञानप्रबोधिनी स्केटिंग क्लबच्या खालील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
बिगीनिअर स्केटिंग प्रकार मुले – तेजस संतोष माळी, रौनक रविकांत गच्चे, श्रीजीत क्रितीराज पाटणे, नीरज महेश देसाई, रुद्र युवराज पवार, सक्षम संदीप पवार, स्वराज यशवंत डावरे, अनमोल सोमनाथ वाघेला, सत्यजित अमित देवडकर, हर्षवर्धन सुरेश खैरी, ओम अतुल जाधव, राजन प्रणव शिंदे, आरव कांबळे, तेजस डावरे, प्रणव सुशीलकुमार शिंत्रे, सार्थक संचित पाटील, पृथ्वीराज ज्ञानेश्वर सुतार, कृष्णराज सुशांत पाटील

बिगीनिअर स्केटिंग प्रकार मुली – सानवी हर्षल पाटील, आयेशा बाळू पटेकर, जिक्रा राजाराम सनदी, श्रीशा महेश माळी, मीरा शरद माणगावकर, प्रांजल श्रीरंग भोसले, शिवन्या रामदास देवडकर, कार्तिकी सुशांत देवडकर
क्वॉड स्केटिंग प्रकार मुले – शौर्य राज पाटील, श्रवण श्रेयस चोडणकर, सिद्धांत शशिकांत पाटील, साईराज सागर मोरबाळे
क्वॉड स्केटिंग प्रकार मुली – स्वरांगी संतोष साळोखे, तनिष्का अमित हवालदार, प्रणवी प्रवीण पाटील, मैथिली संतोष पवार
या सर्व विद्यार्थ्यांना प्रशिक्षक इंद्रजीत मराठे यांचे मार्गदर्शन तर संस्थाध्यक्ष प्राचार्य मिलिंद पांगिरेकर यांच्यासह पालकांचे प्रोत्साहन लाभले.

फोटो : ज्ञानप्रबोधिनी स्केटिंग क्लबच्या खेळाडूंचा सत्कार करताना श्री.मौनी विद्यापीठाचे माजी सदस्य व्ही.जे.कदम सोबत प्रशिक्षक इंद्रजीत मराठे व पालक वर्ग

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31