नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , आनंदवन येथील अक्षरमित्र स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात उभारली पुस्तकांची गुढी : श्री.बी.के.गोंडाळ यांच्या उपक्रमाचे कौतुक – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

आनंदवन येथील अक्षरमित्र स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात उभारली पुस्तकांची गुढी : श्री.बी.के.गोंडाळ यांच्या उपक्रमाचे कौतुक

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

आनंदवन येथील अक्षरमित्र स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात उभारली पुस्तकांची गुढी : श्री.बी.के.गोंडाळ यांच्या उपक्रमाचे कौतुक

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, राजापूर
गुढी पडव्याचे औचित्य साधून राजापूर तालुक्यातील जुवाठी माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक बी.के.गोंडाळ यांनी आपल्या आनंदवन मधील अक्षरमित्र स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामध्ये मानवी जीवनामध्ये अखंडपणे ज्ञानामृत देणाऱ्या पुस्तकांची गुढी उभी करण्याचा उपक्रम राबविला. तसेच उपस्थित विद्यार्थ्यांना ग्रंथभेट दिली.
यावेळी वयोवृद्ध माता सुनंदा मयेकर,चंद्रभागा मयेकर, निरंजनी मयेकर, बी.के.गोंडाळ यांच्या पत्नी मालती गोंडाळ तसेच विद्यार्थींनी कोमल परब, आदिती सूर्यवंशी, दिक्षा मोंडे यांच्या हस्ते या पुस्तकांच्या गुढीचे पूजन करण्यात आले यावेळी बी.के.गोंडाळ सामाजिक कार्यकर्ते अक्षय कशेलकर व गोंडाळ यांचे आजी माजी विद्यार्थी उपस्थित होते.
ग्रामीण भागात वाचन संस्कृती रुजावी यासाठी विविध उपक्रम राबविणाऱ्या अक्षरमित्र बी के गोंडाळ यांच्या चला उभारु पुस्तकांची गुढी या अनोख्या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728