भुदरगड तालुका काँग्रेस सेलच्या अध्यक्षपदी प्राचार्य श्री.डी.एस. देसाई : माजी मंत्री, आम.सतेज डी.पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
भुदरगड तालुका काँग्रेस सेलच्या अध्यक्षपदी प्राचार्य श्री.डी.एस. देसाई : माजी मंत्री, आम.सतेज डी.पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
भुदरगड तालुका राष्ट्रीय काँग्रेस सेलच्या अध्यक्षपदी प्राचार्य श्री.डी.एस.देसाई यांची तर उपाध्यक्षपदी संदिप महादेव चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली. नूतन पदाधिकाऱ्यांना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, माजी गृह राज्यमंत्री, आमदार सतेज उर्फ बंटी डी.पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी पुणे विभाग शिक्षक आमदार प्रा.जयंत आसगावकर, शिक्षक सेलचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष विजय जाधव प्रमुख उपस्थित होते.
कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी अंतर्गत शिक्षक सेलच्या जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांच्या निवडी नुकत्याच जाहीर करण्यात आल्या. भुदरगड तालुका काँग्रेस सेलच्या कार्यकारिणीची नावे अशी –
श्री.डी.एस. देसाई – अध्यक्ष, संदिप महादेव चव्हाण – उपाध्यक्ष, उदयसिंह श्रीपतराव देसाई – सचिव, सुनिल वसंत राजिगरे – खजिनदार, श्रीकांत पांडुरंग कासार – सहसचिव तर पांडुरंग साताप्पा हळदकर, प्रकाश लक्ष्मण येजरे, सचिन पांडुरंग डेळेकर, पृथ्वीराज कदम, सौ सविता सुधीर वर्णे व सौ.पद्मजा मोहन शिंदे आदी सदस्य आहेत.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
