कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाने जिल्ह्याची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी अग्रभागी रहावे : डी.एस.पाटील
|
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाने जिल्ह्याची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी अग्रभागी रहावे : डी.एस.पाटील
सेवानिवृत्त मुख्याध्यापक मंडळाच्या वतीने सत्कार समारंभ संपन्न

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ राज्यात आदर्शवत असून यापुढेही संघटना पातळीवरील कामाबरोबरच विविध उपक्रम राबवून जिल्ह्याची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी अग्रभागी रहावे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त मुख्याध्यापक मंडळाचे कार्याध्यक्ष डी.एस.पाटील यांनी केले.
विद्याभवन, कोल्हापूर येथे कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सेवानिवृत्त मुख्याध्यापक मंडळाच्या वतीने जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या सत्कार प्रसंगी अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.
यावेळी महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे कार्याध्यक्ष बाबा पाटील, मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष मिलिंद पांगिरेकर, रविंद्र मोरे, सचिव आर. वाय. पाटील, सहसचिव श्रीकांत पाटील, सेवानिवृत्त मुख्याध्यापक मंडळाचे राज्याचे कार्याध्यक्ष डी.एस.पाटील, जिल्हाध्यक्ष एम. के.आळवेकर यांचा सत्कार करण्यात आला.
प्रारंभी सेवानिवृत्त मुख्याध्यापक मंडळाच्या स्थापनेबाबत अध्यक्ष एम. के.आळवेकर यांनी माहिती सांगितली. यावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापक मंडळाचे चेअरमन डी.एस.पाटील, बाबा पाटील, मिलिंद पांगिरेकर, आर. वाय. पाटील, एन.आर.भोसले, बी.आर.बुगडे यांनी मनोगते व्यक्त केली.
प्रारंभी स्वागत सेवानिवृत्त मुख्याध्यापक मंडळाच्या कार्याध्यक्ष एन.डी.नाझरे यांनी, प्रास्ताविक अध्यक्ष एम. के.आळवेकर यांनी तर आभार एस.वाय.पाटील यांनी मानले. सूत्रसंचालन एन.एस.पसाले यांनी केले.
यावेळी जे.के.पाटील, व्ही.टी.येरुडकर, आर.जी. पाटील, डी.डी. पाटील, एस.सी.मुल्लाणी, जी.ए.पाटील, बी.वाय.पोवार, ए.आर.पाटील, पी. के. पाटील, ए.व्ही.पाटील, डी. एस. देसाई, के.ए. देसाई, टी . डी. मुसळे, सुरेश कांबळे, डी. बी.भारमल, शिवाजी नाना माळकर, बाबुराव श्रीपती कांबळे यांच्यासह सेवानिवृत्त मुख्याध्यापक उपस्थित होते.
फोटो : जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या सत्कार प्रसंगी डी.एस.पाटील, बाबा पाटील, मिलिंद पांगिरेकर, आर. वाय. पाटील, एम. के.आळवेकर आदी
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा





