‘राजर्षी शाहू प्रेरणा पुरस्कारा’साठी माहिती पाठविण्याचे आवाहन
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
‘राजर्षी शाहू प्रेरणा पुरस्कारा’साठी माहिती पाठविण्याचे आवाहन
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांना आदर्श मानून विविध जनसेवेच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांना ‘राजर्षी शाहू प्रेरणा पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार असून या पुरस्कारासाठी आपल्या कार्याची माहिती 9890554340 या व्हाट्सअपच्या नंबरवर पाठवावी असे आवाहन करण्यात आले आहे.
या पुरस्कारासाठी राजर्षी शाहू महाराज यांचे विचार मान्य असणारा कोणताही भारतीय नागरिक माहिती पाठवू शकतो.
पुरस्काराचे स्वरुप मानाचा फेटा, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि पुस्तके असे आहे. पुरस्कार देण्यास संख्येची मर्यादा असल्यामुळे ज्यांची माहिती प्रथम येईल त्यांचाच प्रथम विचार केला जाणार आहे. पुरस्कार निवडीचे स्वातंत्र्य निवड समितीकडे राखीव असेल.
अधिक माहितीसाठी निर्मिती विचारमंच, बालसाहित्य कलामंच, 873, क/2, सी वॉर्ड,सिध्दीश्री प्लाझा, राजाराम रोड, उमा टॉकीज चौकाजवळ, सिद्धिविनायक मंदिरा समोर, कोल्हापूर – 416002 किंवा मो. नं.9890554340 यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुरस्कारप्राप्त व्यक्तीस रविवार 9 जून, 2024 रोजी दुपारी 12 वा. राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे होणाऱ्या तिसऱ्या राजर्षी राष्ट्रीय लघु चित्रपट महोत्सवात सन्मानित करण्यात येणार आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
