नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , श्री.राहुल शिंदे यांना दिल्लीच्या संस्थेचा यावर्षीचा इंडियन आयकाॅन ॲवाॅर्ड : सर्व थरातून अभिनंदनाचा वर्षाव – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

श्री.राहुल शिंदे यांना दिल्लीच्या संस्थेचा यावर्षीचा इंडियन आयकाॅन ॲवाॅर्ड : सर्व थरातून अभिनंदनाचा वर्षाव

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

श्री.राहुल शिंदे यांना दिल्लीच्या संस्थेचा यावर्षीचा इंडियन आयकाॅन ॲवाॅर्ड : सर्व थरातून अभिनंदनाचा वर्षाव

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, मुरगूड
तीन तपाहून अधिक काळ आदर्शवत वाटचाल करणाऱ्या आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक अग्रगण्य संस्था म्हणून ख्याती असलेल्या श्री.गणेश नागरी सहकारी पतसंस्थेचे तरूण, उत्साही आणि उमदे कार्यलक्ष्यी संचालक श्री.राहुल शामराव शिंदे यांना दिल्ली येथील काइट्सक्राफ्ट प्राॅडक्शन, एल एल पी या नामवंत संस्थेने
‘इंडियन आयकाॅन ॲवाॅर्ड्स २०२४’ ने नुकतेच सन्मानित केले आहे. त्यांच्या या गौरवाबद्दल त्यांचे सर्व थरातून अभिनंदन होत आहे.
श्री.राहुल शिंदे हे गेली ३२ वर्षे या संस्थेत कार्यरत असून अत्यंत निष्ठेने, सेवाभावी वृत्तीने त्यांनी आजवरची वाटचाल केली आहे. एका सामान्य, गरीब कुटुंबातील श्री. शिंदे यांनी खडतर परिस्थितीतून आजपर्यंत याच संस्थेत सेवा करत, आपले शिक्षण पूर्ण केले. कुटुंबाचा सांभाळ करत, सर्वांची मने जिंकत त्यांनी श्री.गणेश नागरी पतसंस्थेत इमानेइतबारे सेवा बजावली. पतसंस्थेतील एक पिग्मी एजंट ते शंभर कोटींहून अधिक ठेवी असणाऱ्या,याच पतसंस्थेत “कार्यलक्ष्यी संचालक (एम डी)”* असा त्यांचा प्रवास अत्यंत कौतुकास्पद झालेला आहे.
आपल्या यशात आणि या सन्मानात संस्थेचे पदाधिकारी व सन्माननीय संचालक मंडळासह, सर्व सहकारी स्टाफ,सभासद आणि असंख्य हितचिंतक,कुटुंबीय या सर्वांच्या सहकार्याचा व शुभेच्छांचा बहुमोल वाटा असल्याचे राहुल शिंदे यांनी यावेळी नम्रतापूर्वक सांगितले.
दरम्यान श्री. राहुल शिंदे यांना प्राप्त झालेल्या या सन्मानामुळे गणेश नागरी सहकारी पतसंस्थेचा खऱ्या अर्थाने लौकिक झाल्याच्या प्रतिक्रिया संस्थेचे पदाधिकारी, संचालक मंडळ आणि प्रमुख सभासदांनी व्यक्त केल्या.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728