नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , सर्वोत्कृष्ट रोलर रिले खेळाडू पुरस्कार ज्ञानप्रबोधिनी स्केटिंग क्लब, कोल्हापूरच्या खेळाडूंना – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

सर्वोत्कृष्ट रोलर रिले खेळाडू पुरस्कार ज्ञानप्रबोधिनी स्केटिंग क्लब, कोल्हापूरच्या खेळाडूंना

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

सर्वोत्कृष्ट रोलर रिले खेळाडू पुरस्कार ज्ञानप्रबोधिनी स्केटिंग क्लब, कोल्हापूरच्या खेळाडूंना

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
रोलर रिले स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने ४० व्या राष्ट्रीय रोलर रिले स्केटिंग स्पर्धेचे आयोजन पणजी (गोवा) येथे करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी देशातील विविध राज्यातून २०० खेळाडूंनी सहभाग नोंदवला. या स्पर्धा स्पीड स्केटिंग तसेच रोलर रिले स्केटिंग या प्रकारामध्ये घेण्यात आल्या. यामध्ये ज्ञानप्रबोधिनी स्केटिंग क्लब, कोल्हापूरच्या खेळाडूंनी विविध गटामध्ये सुवर्ण त्याचबरोबर रौप्य पदकांची कमाई करत सर्वोत्कृष्ट ऑल इंडिया रोलर रिले स्केटिंग खेळाडू पुरस्कार रोलर रिले स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे जनरल सेक्रेटरी भिकन अंबे यांच्या हस्ते प्राप्त केला.
जून २०२४ अखेर श्रीलंका येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. पुरस्कार मिळाले खेळाडू असे कु. सांची कुमरे (गारगोटी), कु. साईराज मोरबाळे (लिंगनूर), कु. सार्थक गोंधळी (कागल) कु.आरव कांबळे (मेतके)
स्पर्धेतील खेळाडूंची कौशल्य, स्पर्धा नेपून्यता त्याचबरोबर स्पर्धेमध्ये खेळाडूंनी मिळवलेली मिडल्स याच्या आधारे हा पुरस्कार देण्यात येतो. असे पुरस्कार जाहीर करताना भिकन अंबे यांनी सांगितले.
सर्वोत्कृष्ट पुरस्कारांची नावे जाहीर होताच खेळाडू तसेच पालकांनी एकच जल्लोष केला. यावेळी फेडरेशनचे सर्व पदाधिकारी, विविध राज्यातून आलेले प्रशिक्षक, खेळाडू त्याचबरोबर पालक उपस्थित होते.
या सर्व विद्यार्थ्यांना प्रशिक्षक इंद्रजीत मराठे यांचे मार्गदर्शन लाभले तर संस्थाध्यक्ष मिलिंद पांगिरेकर, पालक महादेव गोंधळी,सागर मोरबाळे, चंद्रभान कुंमरे, विजय कांबळे यांचे प्रोत्साहन मिळाले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031