नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , ऊसतोड मजूर आणि वेटरच्या लेकीचं ‘नीट’ परिक्षेत मिळविले ७२० पैकी तब्बल ६२३ गुण : ‘ऋतिका’ चे डॉक्टर बनण्याचे स्वप्न पुर्ण होण्यासाठी कौतुकाबरोबर हवी अर्थिक मदतीची गरज – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

ऊसतोड मजूर आणि वेटरच्या लेकीचं ‘नीट’ परिक्षेत मिळविले ७२० पैकी तब्बल ६२३ गुण : ‘ऋतिका’ चे डॉक्टर बनण्याचे स्वप्न पुर्ण होण्यासाठी कौतुकाबरोबर हवी अर्थिक मदतीची गरज

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

ऊसतोड मजूर आणि वेटरच्या लेकीचं ‘नीट’ परिक्षेत मिळविले ७२० पैकी तब्बल ६२३ गुण : ‘ऋतिका’ चे डॉक्टर बनण्याचे स्वप्न पुर्ण होण्यासाठी कौतुकाबरोबर हवी अर्थिक मदतीची गरज

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, नाधवडे
…..तिच्या आई-वडीलांचे शेतात राबणारे कष्टाळू हात. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत प्रतिकूल. आमचं कितीही हाल होवू दे. पण पोरीला शाळेला कांही कमी पडू द्यायचं नाही ही आई-वडिलांची जिद्द. तिच्या शिक्षणासाठी वडिलांनी हंगामात ऊसतोड मजूर म्हणून आणि इतरवेळी हॉटेलमध्ये वेटर म्हणून केलेले काम. जोडीला पोरीनं जिद्द,चिकाटी,महत्वकांक्षा व अभ्यासातील सातत्य यांच्या जोरावर नुकत्याच जाहीर झालेल्या ‘नीट’ परीक्षेच्या निकालात लख्ख यश मिळवलं आणि तिच्यासह आई-वडीलांना आनंदाचं भरतं आलं तर गावातील पहिलीच मुलगी डॉक्टर होणार म्हणून अख्खा गावच आनंदात न्हाऊन गेला. हे यश खेचून आणलयं नाधवडे (ता.भुदरगड) येथील कु.ऋतिका रघुनाथ पाटील या मुलीने.
ऋतिकाचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गावातच झाले. तर मुदाळच्या प. बा. पाटील सायन्स अकॅडेमीमधून ८० टक्के गुण मिळवत १२ वी उत्तीर्ण झाली आहे. तर यापूर्वी तिने पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यस्तरीय यश मिळविले आहे.तसेच आठवी एनएमएमएस शिष्यवृत्ती परिक्षेत यश मिळवत तिने आपल्या बुध्दीची चमक दाखवून दिली होती.याच शिष्यवृत्तीच्या पैशाचा तिला पुढील शिक्षणासाठी मोलाचा हातभार लागला आहे.
तिची आई सौ.सविता व वडील रघुनाथ हे आपल्या तुटपुंज्या शेतात कष्ट करतात. वडील हंगामात ऊसतोड मजूर म्हणून काम करीत असतात आणि इतरवेळी हाँटेलमध्ये वेटर म्हणून राबत आहेत. हे दांम्पत्य कष्ट करुन मुलांच्या शिक्षणासाठी पैसा उभा करत आहेत. जोडीला संसाराचा गाढा ओढत कुटूंबाला आर्थिक हातभार लागावा म्हणून पशु-पालन करुन दुग्ध व्यवसाय करीत आहेत.शिवाय ऋतिका घरी धुणं-भांड्याबरोबरच स्वयंपाक बनवून आई-वडिलांना कामात हातभार लावत असते. ती शाळेच्या वेळेव्यतिरीक्त घरी सलग आठ-नऊ तास अभ्यास करत होती.तिच्या शिक्षणासाठी शाळेबरोबरच मामा सचिन एकल (चिमगांव) व स्नेही किशोर इंगळे (पांगिरे) यांचे मोलाची मदत झाली आहे.
यावर्षी ५ मे रोजी नॅशनल टेस्टींग एजन्सीमार्फत वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या ‘नीट’ परिक्षेसाठी देशभरांतून २६ लाख विद्यार्थी बसले होते. त्यातून ऋतिकाने ७२० पैकी तब्बल ६२३ गुण मिळवित आँल इंडिया रँकमध्ये तिने ५५,५५१ वे स्थान प्राप्त केले आहे. तिला ९८% गुण मिळाले आहेत. ऊसतोड मजूर व हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीच्या मुलीनं अपार कष्टातून मिळविलेल्या चमकदार यशाबद्दल ऋतिकाचे सर्वत्र कौतुक आहे.

ध्येयाची निश्चती करा..!
आपल्या गरीब परिस्थितीचे कारण पुढे करुन विद्यार्थ्यांनी प्रयत्नवादाकडे दुर्लक्ष करु नये.मनामध्ये ध्येय निश्चित करुन व योग्य साधने वापरत ध्येयाच्या दिशेने सतत चालत राहिल्यास यश निश्चित मिळते.माझ्या यशात शाळेबरोबरच आई-वडील व स्नेहीं यांचा मोलाचा वाटा आहे. – कु.ऋतिका पाटील (विद्यार्थीनी)

दानी हातांची गरज..!
ऋतिकाच्या घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. तिच्या पुढील शिक्षणासाठी लाखों रुपयांची आवश्यकता भासणार आहे.याबाबत चर्चा करतांना तिच्या व वडिलांच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले. वडील हातबल झाले आहेत.गरज आहे ती आपणांसारख्या समाजातील दानशूर व्यक्ती व संस्थांनी पुढे येवून तिला सढळ हस्ते अर्थिक मदत करण्याची.तर आणि तरच या गरीबाच्या लेकीचं डॉक्टर होण्याचे स्वप्न सत्यात उतरणार आहे. यासाठी खालील ठिकाणी अर्थिक मदत पाठविता येते.
श्री.रघुनाथ शामराव पाटील मु.पो.नाधवडे,
ता.भुदरगड जि.कोल्हापूर (बँक आँफ महाराष्ट्र, शाखा कूर)
खाते क्रमांक-60098558339
IFSC-MAHB0000818

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728