नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , डॉ.सुनीलकुमार लवटे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

डॉ.सुनीलकुमार लवटे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

डॉ.सुनीलकुमार लवटे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
जेष्ठ साहित्यिक डॉ.सुनीलकुमार लवटे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष प्राचार्य जी. पी. माळी व सचिव शिक्षण विस्तार अधिकारी श्री.विश्वास सुतार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी ११ एप्रिल २०२४ रोजी वयाच्या पंच्याहत्तरीत प्रवेश केला आहे. त्यांचे सामाजिक, साहित्यिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्याचा विचार करता त्यांचे अमृत महोत्सवी वर्ष वैचारिक मंथन आणि विविध समाजोपयोगी उपक्रमाने साजरे करण्यात येत आहे.
अमृत महोत्सव समितीमार्फत वर्षभरात चार कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. रविवार २३ जून रोजी डॉ. विवेक सावंत (चीफ मेंटर, एमकेसीएल फाउंडेशन) यांचे ‘कृत्रिम बुद्धिमत्तेची क्षितिजे व मानव
संभाव्य’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. यावेळी विनोदकुमार लोहिया अध्यक्षस्थान भूषवणार आहेत.
पेटाळा येथील राम गणेश गडकरी सभागृहात दुपारी ४ वाजता व्याख्यान होणार आहे.
रविवार २२ सप्टेंबर रोजी ज्येष्ठ पत्रकार साहित्यिक प्रा. सुरेश द्वादशीवार यांचे ‘चार्वाक ते पानसरे’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. डॉ. जयसिंगराव पवार अध्यक्षस्थानी असतील. यावेळी डॉ. प्रमोद मुनघाटे यांची उपस्थिती राहणार आहेत.राम गणेश गडकरी सभागृहात दुपारी ४ वाजता व्याख्यान होणार आहे.
नियोजनाच्या बैठकीस प्राचार्य डॉ. जी. पी. माळी, विश्वास सुतार, प्राचार्य डॉ. बी. एम. हिर्डेकर, प्राचार्य डॉ. प्रवीण चौगले, प्राचार्य प्रभाकर हेरवाडे, प्रा. टी. के. सरगर, प्रा. सी. एम. गायकवाड, संजय कळके, सागर बगाडे, प्रा. जॉर्ज क्रुझ, अमेय जोशी, विजय एकशिंगे, दीपक जगदाळे, अमेय जोशी, भाग्यश्री कासोटे आदी उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031