निर्मिती विचारमंचच्या सामाजिक कृतज्ञता पुरस्कारांचे ९ जून रोजी कोल्हापुरात वितरण : धाडसी आणि संवेदनशील माध्यमकर्मींचा होणार जाहीर सत्कार
|
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
निर्मिती विचारमंचच्या सामाजिक कृतज्ञता पुरस्कारांचे ९ जून रोजी कोल्हापुरात वितरण : धाडसी आणि संवेदनशील माध्यमकर्मींचा होणार जाहीर सत्कार

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
निर्मिती विचारमंच, कोल्हापूरच्या वतीने देण्यात येणाऱ्या सामाजिक कृतज्ञता पुरस्कारांचे वितरण रविवार ९ जून, २०२४ रोजी दुपारी १ वाजता श्री.राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे होणार आहे.
उपेक्षित, वंचित आणि दुर्लक्षितांच्या समस्या, प्रश्न चव्हाट्यावर मांडून त्या सोडवण्यासाठी पत्रकारितेचा वापर करणाऱ्या धाडसी आणि संवेदनशील माध्यमकर्मींचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. सामाजिक कृतज्ञता पुरस्कार २०२४ चे मानकरी असे – श्री.दयानंद लिपारे, श्री.रणजित माजगावकर, श्री.चंद्रकांत पाटील, श्री.शीतल धनवडे, श्री.नसीर अत्तार, श्री.सुनिल ठाणेकर, श्री.बाळासाहेब कोळेकर, श्री.राजाराम लोंढे, श्री.कृष्णात चौगले, श्री.सागर यादव, श्री.सतिश घाटगे, श्री.संगम कांबळे, श्री.अमोल सावंत, श्री.दुर्वा दळवी, श्री.अभिजीत पाटील
या समारंभास पुरस्कार निवड समिती अध्यक्ष ताज मुल्लाणी यांची विशेष उपस्थिती असून पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय नेते जयदीप कवाडे, ज्येष्ठ आंबेडकरवादी नेते प्रा.शहाजी कांबळे, ज्येष्ठ लेखक व विचारवंत डॉ. राजेखान शानेदिवाण, संभाजी ब्रिगेडचे राज्य कार्याध्यक्ष हिंदुराव हुजरे-पाटील, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष डॉ. नंदकुमार गोंधळी, धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा ॲड. करुणा विमल, आंबेडकरवादी नेते विश्वासराव तरटे आदी उपस्थित राहणार आहेत.
सदर पुरस्कार वितरण समारंभास
मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन
निर्मिती विचारमंच, कोल्हापूरचे अनिल म्हमाने व डॉ. शोभा चाळके यांनी केले आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा





