नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , वटपौर्णिमा विशेष : रोपनिर्मिती – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

वटपौर्णिमा विशेष : रोपनिर्मिती

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

वटपौर्णिमा विशेष : रोपनिर्मिती

🌳 घरच्या घरी वडाची रोपे तयार करु आणि निसर्गाची सेवा करु 🌳

– टिम वर्ल्ड फॉर नेचर

वडाची रोपे कशी तयार करायची याची सविस्तर माहिती करून घेऊया. यासाठी आपण वडाच्या झाडाच्या छोट्या छोट्या फांद्या लागणार आहेत. यासाठी आपण कोणतेही वडाचे झाड तोडायचे नाहीय, तर तोडलेल्या झाडांच्या फांद्या वापरायच्या आहेत.
पावसाळ्यापूर्वी वीज कंपनीकडून, महानगरपालिकेकडून उंच वाढलेली झाडे अपघात टाळण्यासाठी छाटण्यात येतात. यावेळी छान डेरेदार वाढलेली वड, पिंपळ, नांद्रुक यासारखी झाडे पण छाटण्यात येतात. तसेच वटपौर्णिमेला रस्त्याकडेला बरेच विक्रेते वडाच्या छोट्या फांद्या छाटून त्या विक्रीला ठेवतात व त्या आपल्यातील बरेच लोक घरी जाऊन पूजतात. तर मित्रांनो आपल्याला या छाटलेल्या फांद्यांचा वडाची रोपे करण्यासाठी उपयोग करायचा आहे.
१) सर्व छाटलेल्या फांद्या गोळा करून त्याचे एक ते दीड फुट लांबीचे कटिंग करून घ्या. शक्यतो एकसमान व सरळ फांद्याचे कटिंग असावेत. फांदीची सर्व पाने काढून टाका.
२) ह्युमिक ऍसिडची योग्य मात्रा पाण्यात मिक्स करून त्यामध्ये वडाच्या सर्व कटिंग केलेल्या फांद्या ५ ते ६ तास भिजवून ठेवा, यामुळे मुळ्या फुटण्याचे प्रमाण वाढते व रोपाला फुटवे पण लवकर फुटतात.
३) तुम्ही या सर्व कटिंग केलेल्या वडाच्या फांद्या बुरशीनाशक पाण्यामध्ये थोड्या वेळासाठी (अर्धा तास) बुडवून ठेवू शकता व मातीत जाणाऱ्या कटिंगच्या भागाला कोरफड गर लावू शकता व त्या कटिंगच्या फांद्या प्लॅस्टिक पिशवीत (टाकाऊ दुधाची पिशवी, अर्धी कापलेली बाटली) पेरू शकता.
४) या सर्व कटिंग केलेल्या वडाच्या फांद्या तुम्ही माती, शेणखत व थोडी वाळू या मिश्रणात लावू शकता जेणेकरुन योग्य प्रमाणात पाण्याचा निचरा होऊ शकेल व बुरशीपासून नवीन रोपाचे संरक्षण होईल.
५) तसेच कटिंग केलेल्या फांद्या या ४ ते ५ इंच जमिनीत पेरून त्या कटिंगच्या शेंड्याला तुम्ही शेणाचा गोळा लावू शकता किंवा घट्ट प्लॅस्टिक गुंडाळू शकता. (जसे आपण गुलाबाची रोपे लावताना करतो तसे) तसेच फांदीच्या वरच्या टोकाला हाताने हळद किंवा बुरशीनाशक लावा, जेणेकरून कटिंग्ज वरून खाली कुजत जाणार नाहीत.
६) हे सर्व कटिंग पेरल्यानंतर त्यातील ओलावा कायम मेंटेन राहिला पाहिजे व हे सर्व कटिंग सावलीत ठेवावेत. ओलावा कायम राहण्यासाठी तुम्ही कोकोपीटचा वापर ही करू शकता व स्प्रे पद्धतीने सतत या कटिंग्जवर पाणी मारू शकता.
७) या सर्व कटिंग्जना साधारण १५ ते २० दिवसात नवीन फुटवे फुटतात. काही कटिंग्जना ना वेळ ही लागू शकतो. फुटवे फुटल्यानंतर नवीन पानांची हळूहळू वाढ होऊ लागेल.
८) आपल्याला मग ही पाने फुटलेली वडाची कटिंग्ज बाहेर काढून मोठ्या ग्रोबॅग मध्ये शिफ्ट करता येतील व हे शाखीय प्रजनन मधून तयार झालेले रोप शक्यतो थोडे मोठे झाल्यावर तुम्ही त्याचे रोपण करावे. म्हणजे त्याची जगण्याची शक्यता वाढते.
९) वड, पिंपळ, नांद्रुक ही निसर्गातील महत्वाची व डेरेदार वाढणारी झाडे आपण घरच्या घरी या शाखीय पद्धतीने तयार करू शकतो.

लक्षात ठेवा आपण सर्वजण, इथला प्रत्येक माणूस, प्रत्येक नागरिक निसर्गसेवक आहोत. या वडाच्या कटिंग केलेल्या फांद्यांची रोपे झालेली पाहणे खुपच आनंद देणारी गोष्ट आहे. मग चला तर या पावसाळ्यात ही लहान रोपे (कटिंग्जपासून) तयार करून त्यापासून वडाची चांगली झाडे तयार होईपर्यंत त्याची काळजी घेऊया.

✍ टिम वर्ल्ड फॉर नेचर
📱 9850339373

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031