शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना टप्पा वाढ करावी : आमदार जयंत आसगावकर यांची मंत्री नाम.केसरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
|
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना टप्पा वाढ करावी : आमदार जयंत आसगावकर यांची मंत्री नाम.केसरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, मुंबई
प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक 20 टक्के, 40 टक्के व 60 टक्के वेतन अनुदान घेत असलेल्या शाळांना पुढील देय टप्प्यासाठी अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करावी, अशी मागणी आमदार जयंत आसगावकर यांनी निवेदनाद्वारे शालेय शिक्षणमंत्री नाम.दीपक केसरकर यांच्याकडे केली. टप्पा वाढीसाठी 800 कोटींचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठविला असून येत्या कॅबिनेटमध्ये तो मंजूर केला जाईल.असे शिक्षणामंत्र्यांनी सांगितले.
आमदार जयंत आसगावकर यांनी आज अधिवेशन काळात मंत्री केसरकर यांची भेट घेऊन टप्पा वाढीबाबत चर्चा केली.
आमदार जयंत आसगावकर यांनी या अर्थसंकल्पात टप्पा वाढीसाठी आर्थिक तरतूद करावी तसेच त्यांना यापुढे प्रचलित धोरणानुसार 100 टक्के अनुदान द्यावे, अशी मागणी केली.
मंत्री केसरकर म्हणाले, टप्पा वाढीसाठी 800 कोटींचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठविला असून येत्या कॅबिनेटमध्ये तो मंजूर केला जाईल.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा





