विद्यार्थ्यांना शालेय वयातच परकीय जर्मन भाषा शिकण्याची संधी : प्रायव्हेट हायस्कूलमध्ये स्तुत्य उपक्रमाची सुरुवात
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
विद्यार्थ्यांना शालेय वयातच परकीय जर्मन भाषा शिकण्याची संधी : प्रायव्हेट हायस्कूलमध्ये स्तुत्य उपक्रमाची सुरुवात
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
स्पर्धेच्या युगातील विद्यार्थी बहुकौशल्याधिष्ठित व्हावा या हेतूने मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत या शालेय भाषेसोबत एक परकीय भाषाही अवगत व्हावी, यासाठी प्रशालेत मागील वर्षापासून जर्मन भाषा शिकविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या अनुषंगाने यावर्षीही इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांची बैठक प्रशालेमध्ये आयोजित करण्यात आली. या बैठकीत उपस्थित पालकांसमोर प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.जी.एस. जांभळीकर यांनी जर्मन भाषेचे महत्त्व विशद केले. याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून जर्मन भाषा शिकविण्यात येणार आहे ते जर्मन स्थित कोल्हापुरातील नागरिक श्री.केदार जाधव यांनी ऑनलाइन पालकांशी थेट संवाद साधला व पालकांना जागतिक स्तरावरील जर्मन भाषेचे महत्त्व व भविष्यातील उपलब्ध संधी स्पष्ट करून सांगितली. तसेच पालकांच्या सर्व शंकांचे निरसन करण्यात आले. मागील वर्षाचा जर्मन भाषा वर्गाचा अहवाल व यावर्षी सुरु होणाऱ्या जर्मन भाषा ऑनलाईन अध्यापन वर्गाचे नियोजन व सर्व माहिती प्रशालेचे तंत्रस्नेही शिक्षक व विभाग प्रमुख श्री आर.डी.जाधव यांनी दिली.
सदर पालक सभेसाठी इयत्ता सातवीचे ६० पालक उपस्थित होते. तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापक श्री. जी. एस. जांभळीकर, पर्यवेक्षक श्री. पी. एम. जोशी व जिमखाना प्रमुख श्री. एस. आर. गाणबावले उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत, प्रास्ताविक श्री ए. डी. पाटील यांनी केले. तर जर्मन वर्गाच्या पालक सभेचा समारोप व आभार प्रशालेचे जिमखाना प्रमुख श्री.एस. आर. गाणबावले यांनी मानले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
