ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश कौतुकास्पद : डॉ.क्रांतिकुमार पाटील
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश कौतुकास्पद : डॉ.क्रांतिकुमार पाटील
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कडगांव
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश कौतुकास्पद असल्याचे उद्दगार ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ.क्रांतिकुमार पाटील यांनी काढले ते कुमार भवन कडगांव (ता.भुदरगड) येथे इयत्ता दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाच्या निमित्ताने बोलत होते. यावेळी गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे व शाळेचे मुख्याध्यापक एस.आर.पाटील उपस्थित होते.
श्री.पाटील म्हणाले कै.व्ही.टी.पाटील यांनी मौनी विद्यापीठाच्या माध्यमातून भुदरगड सारख्या दुर्गम भागातील विद्यार्थाना शिक्षणाची सोय उपलब्ध करुन दिली. कडगाव येथील ही प्रशाला म्हणजे काकाजींचे स्मारक आहे. सलग नऊ वर्ष शंभर टक्के निकाल लावून प्रशालेने आपली गुणवत्ता टिकवून ठेवली आहे.
यावेळी दीपक मेंगाणे यांनी तालुक्यातील मोजक्या शाळांच्या यादीत कुमार भवन, कडगाव येत असल्याचे सांगितले. शिक्षक आणि विद्यार्थांच्या योग्य नियोजनामुळे शाळेचा शंभर टक्के निकाल शक्य झाला. मुलांना आत्मसन्मानाने वागवले पाहिजे परीक्षेतील गुणांमध्ये गुणवत्ता नाही आपल्या पाल्यामधील गुणवतेचा शोध पालकांनी घेतला पाहिजे असे सांगितले.
यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक एस.आर.पाटील यांना गुरूवर्य डी.डी.आसगावकर आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा तसेच इयत्ता दहावीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थांचा सत्कार डॉ.क्रांतिकुमार पाटील व दीपक मेंगाणे यांच्या हस्ते करण्यात आला. प्रारंभी प्रास्ताविक एस.बी.हजारे यांनी सूत्रसंचालन सौ.एस.एस.सावंत यांनी तर आभार एस.बी.गुरव यांनी मानले.यावेळी पालक सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
