मुरुक्टे विकास मंडळ मुंबईचे समाजउपयोगी उपक्रम प्रेरणादायी : वनपाल सदाशिव देसाई
|
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
मुरुक्टे विकास मंडळ मुंबईचे समाजउपयोगी उपक्रम प्रेरणादायी : वनपाल सदाशिव देसाई

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, पिंपळगाव
मुरुक्टे विकास मंडळ मुंबईच्या युवकांनी राबवलेले समाजउपयोगी उपक्रम प्रेरणादायी आहेत, असे प्रतिपादन वनपाल सदाशिव देसाई यांनी केले. मुरुक्टे (ता.भुदरगड) येथील वृक्षारोपण कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. सरपंच रंजना कांबळे अध्यक्षस्थानी होत्या.
मुरुक्टे ता.भुदरगड येथील मुख्य रस्त्याच्या दुतर्फा वनविभाग पिंपळगाव, मुरुक्टे विकास मंडळ, मुंबई यांच्या मार्फत झाडे लावण्यात आली. यावेळी वनपाल सदाशिव देसाई यांचा माजी सरपंच अरुण बेलेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी वनरक्षक एस.आर.बाऊस्कर, नेताजी भोसले, जयराम पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. सुधीर शिंञे व सदाशिव सुतार यांनी मागील चार वर्षातील झाडांना पाणी घालण्याबरोबर झाडांची निगा राखल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी अवधुत पाटील साताप्पा माने, बबन आयरे,संतोष पोवार,अविनाश पोवार,प्रमोद पाटील,कुणाल यादव,सुनिल कांबळे,प्रविण अडसुळ, पंडीत नाझरे, वत्सला बुडके, मोहन पाळेकर, दत्तात्रय जाधव,दत्तात्रय बुडके, निलेश आडसुळ, चंद्रकांत गुरव, उमेश शिंत्रे, आदी उपस्थित होते. संजय खोचारे यांनी प्रास्ताविक केले. प्रमोद पाटील यांनी आभार मानले.
फोटो – मुरुक्टे ता.भुदरगड येथे वृक्षारोपण करतांना वनपाल सदाशिव देसाई,वनरक्षक एस.आर.बाऊस्कर,नेताजी भोसले
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा





