नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , तुटलेल्या विद्युत तारांमुळे होणाऱ्या अपघाताबाबत सजगतेने काळजी घ्यावी : जलविद्युत अभियंता अभिजित सुनिल वाघमोडे यांचे आवाहन – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

तुटलेल्या विद्युत तारांमुळे होणाऱ्या अपघाताबाबत सजगतेने काळजी घ्यावी : जलविद्युत अभियंता अभिजित सुनिल वाघमोडे यांचे आवाहन

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

तुटलेल्या विद्युत तारांमुळे होणाऱ्या अपघाताबाबत सजगतेने काळजी घ्यावी : जलविद्युत अभियंता अभिजित सुनिल वाघमोडे यांचे आवाहन

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
जिल्ह्यात गेल्या आठवडाभरात तुटलेल्या विद्युततारा अनेकांच्या जीवावर बेतल्या आहेत. या घटना वारंवार घडत आहेत. घडलेल्या घटना या खूप दुर्दैवी व मन सुन्न करणाऱ्या आहेत. घरातील कर्ता पुरुष गेल्याने सर्व घरदार कोलमडत आहे. या घटना पुढे होऊ नयेत व कुणाचा जीव जाऊ नयेत म्हणून जलविद्युत अभियंता अभिजित सुनिल वाघमोडे यांनी काही सूचना करुन वीज क्षेत्रातील गांभीर्य समजून घेऊन प्रत्येकाने सजग रहायला हवे असे आवाहन केले आहे.
तुटलेल्या विद्युत तारांमुळे होणाऱ्या अपघाताबाबत कोणती काळजी घ्यावी याबाबत केलेल्या सूचना अशा –
१) कधीही वीज तारा/वायर उघड्या हातानी स्पर्श करू नका. पावसामुळे किंवा वादळ वाऱ्यामुळे जर एखादी तार / वायर जर खाली आली असेल तर त्वरित महावितरणच्या स्टाफच्या निदर्शनास आणून द्या. त्या वायरच्या जवळ जाणे टाळा. कारण खाली आलेली वायर बऱ्याच वेळेला सुरु असते. त्यातून विद्युतप्रवाह चालू असतो. आणी जास्तीतजास्त अपघात व मृत्यू अशावेळी फक्त तारेला/वायरला स्पर्श झाल्यामुळे होतात.
२) टेक्निकली कोणतीही वायर खाली जमिनीला स्पर्श होताच क्षणी earth होऊन पूर्ण विजपुरवठा (supply) खंडित होणे अपेक्षित असते. या अनुषंगाने विजपुरवठा वितरण सिस्टिम तयार केलेली असते. पण काही वेळेस हा supply खंडित होत नाही. अशावेळेस हे धोकादायक ठरते व याच तारा/वायर्स जीवघेण्या ठरतात व अनेकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरतात.
३) बऱ्याच जणांना शेतातील DP बॉक्स मधील फ्यूज स्वतःच्या हाताने काढायची सवय असते. शेतात पाणी पाजून झाले की स्विच बंद करून बरेचजण हाताने फ्यूज काढून तिथेच ठेवतात. हे खूप धोकादायक आहे. बऱ्याचदा शेतातील कामामध्ये आपले हात ओले होतात व आपण गरज नसताना फ्यूजला हात लावतो. ही धोकादायक कृती अजिबात करू नका. Earth लीकेजमुळे तुम्हाला अशावेळी मोठा शॉक लागू शकतो. फ्यूज हे आपल्या DP मधील महत्वाचे इलेक्ट्रिकल प्रोटेक्शन असते.
४) बरेचजण ती खाली आलेली तार/वायर ओल्या काठीने दूर ढकलण्याचा प्रयत्न करतात आणी त्यावेळी जोरात शॉक बसतो. तसेच बऱ्याचदा विद्युतप्रवाह चालू असलेली तार/वायर (live conductor) ही पाण्यात किंवा चिखलात पडलेली असते. अशावेळेस तार/वायर प्रवाही असल्याने खाली असलेल्या चिखलात किंवा पाण्यात विजप्रवाह उतरलेला असतो व त्याचा शॉक बसून हकनाक जीव जातो. त्यामुळे ओल्या काठीने, सळीने, तारांना अजिबात स्पर्श करू नका. पायात शक्य असेल तर बूट वापरा. चप्पल पाण्यात, पावसात भिजते व विद्युत प्रवाही बनू शकते म्हणून बूट वापरा. शेतामध्ये अनवानी पायाने कधीच फिरू नका.
५) शेतामध्ये पाण्यासाठी पंपसेट वापरत असाल किंवा घरी पाण्यासाठी पंपसेट वापरत असाल तर starting इलेक्ट्रिकल पॅनल मध्ये चांगल्या वायर्स, स्विचेस व ब्रेकर्स (आयएसआय मार्क असलेले) वापरा. उदाहरणार्थ ELCB हा ब्रेकर विजेचा शॉक आणि विजेच्या आगीपासून बचाव करण्यासाठी वापरला जातो जो नियंत्रण पॅनेलमध्ये शॉर्ट सर्किटमुळे किंवा ओव्हरलोडमुळे होतो आणि जेव्हा अर्थलिकेज असते तेव्हा स्वयंचलित बंद होते.
६) पावसाळ्यात उच्च दाबाच्या विद्युत वाहिनी खालून जाताना उघडलेली छत्री किंवा उंच वस्तूंचा वापर टाळा. त्यामुळे वीज तारांना स्पर्श होऊ शकतो. पावसाळ्यात ( व इतरवेळी) उच्च दाबाच्या वाहिनीच्या आजूबाजूला साधारण तारेपासून एका मीटरच्या परिघात विद्युतभार असतो व त्यामुळे आपल्याला हलका शॉक (Induction) बसू शकतो.
७) दुर्दैवाने चुकून कधी एखाद्या व्यक्तीला शॉक लागला किंवा ती व्यक्ती त्या तारेला चिकटली तर त्या व्यक्तीला बाजूला करताना तिला हात न लावता सुक्या लाकडाच्या काठीने बाजूला करा. ओल्या काठीचा, लोखंडी किंवा अन्य कोणत्याही धातूचा वापर अशावेळेस करू नका. यासाठी असे सुके लाकूड, एखादी कोरडी काठी, प्लॅस्टिक दांडा आपल्यासोबत ठेवा.
८) शेतातील आणी घरी वापरत असलेल्या पाण्याच्या मोटरला व्यवस्थित electrical earthing करा. केले नसेल तर त्वरित तज्ञ electrician कडून करून त्याची खात्री करून घ्या. कारण फक्त earthing नसल्यामुळे आणी earth लिकेज असल्यामुळे मोटरला स्पर्श होऊन कित्येकजणांचा मृत्यू झाला आहे. या महत्वाच्या कामासाठी वेळ काढून अनुभवी electrician कडून आजच earthing चे काम करून घ्या.
९) पावसाळ्यात एखाद्या ठिकाणी पाण्यात तार/वायर तुटून पडली असेल तर अशावेळेस पाण्यातून जाणे टाळा. कारण वीजप्रवाह खंडीत झाला नसेल तर त्या पाण्यातून वीजप्रवाह वाहत असतो आणि त्याने जीवाला धोका होऊ शकतो. बऱ्याचदा शेतातील, पाण्यात पोहणारी जनावरे याच कारणामुळे दगावतात.
१०) बऱ्याच जणांना two pin न वापरता, घरातील two core केबल (वायर) काडीला गुंडाळून, त्याला पीळ मारून आहे तसे सॉकेटमध्ये घालून सप्लाय सुरु करायची सवय असते. हे खूप धोकादायक आहे. ही चुकीची व जीवघेणी कृती कधीच करू नका.
११) घरातील विद्युत उपकरणे कधीही ओल्या कपड्याने पुसू नका. तसेच वीजेशी किंवा वीजेवर चालणाऱ्या उपकरणाशी खेळू नका. विद्युत उपकरणे हाताळताना सावध रहा.
१२) शॉर्ट सर्किट किंवा वीजेमुळे कधी आग लागली तर त्यावर पाणी टाकू नका. अशावेळी ती आग विझवण्यासाठी वाळू किंवा कोरड्या मातीचा वापर करा.
१३) लक्षात घ्या, आपला जीव हा सर्वात महत्वाचा आहे. त्यामुळे आपली काळजी आपणच घेतली पाहिजे. वीज ही दिसत नाही किंवा कळत देखील नाही. विजेमुळे होणारे जास्तीतजास्त अपघात हे मानवनिर्मित चुकांमुळे होत असतात.
राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील झाला आहे. त्यामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे. शेतीची काम करीत असताना शेतकऱ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे. वीज गेल्यानंतर महावितरणशी संपर्क साधून थोडा वेळ वाट पहा. काही समस्या असेल तर संबंधित वायरमन, लाईनमन यांच्याशी संपर्क साधा.
तुमच्या निदर्शनास अशी तुटलेली वायर, खाली आलेली वायर, पडत आलेला पोल, खांब, पडलेल्या अवस्थेतील DP बॉक्स आल्यास संबधित महावितरणच्या यंत्रणेला निदर्शनास आणून द्या. ही जागरूकता, हा अलर्टनेस कित्येकांचा जीव वाचवू शकतो.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30