नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , घरच्या संस्काराबरोबरच शाळेच्या संस्कारामुळे यशाचे शिखर गाठू शकलो : डॉ.श्री. राजेंद्र कुलकर्णी (हेर्लेकर) – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

घरच्या संस्काराबरोबरच शाळेच्या संस्कारामुळे यशाचे शिखर गाठू शकलो : डॉ.श्री. राजेंद्र कुलकर्णी (हेर्लेकर)

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

घरच्या संस्काराबरोबरच शाळेच्या संस्कारामुळे यशाचे शिखर गाठू शकलो : डॉ.श्री. राजेंद्र कुलकर्णी (हेर्लेकर)

प्रायव्हेट हायस्कूलचा एस.एस.सी. परीक्षा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
जीवनात दोन प्रकारचे संस्कार महत्त्वाचे असतात . घरचे आणि शाळेचे संस्कार. या दोन्ही ठिकाणच्या संस्कारामुळेच यशाचे शिखर गाठू शकलो, असे उदगार नेत्र शल्यविशारद डॉ.श्री.राजेंद्र कुलकर्णी ( हेर्लेकर) यांनी येथील प्रायव्हेट हायस्कूलच्या शालान्त परीक्षा पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी काढले. अध्यक्षस्थानी शाळा समितीचे अध्यक्ष, दि प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्री. उदय सांगावडेकर, व्हा. चेअरमन डॉ. श्री. सुनील कुबेर, सदस्य श्री. प्रकाश मेहता, कार्यवाह सौ.शरयू डिंगणकर आदी उपस्थित होते.
      प्रारंभी संस्थेचे संस्थापक कै. विभूते गुरुजी व कै.अ.वि.जोशी यांच्या पुतळ्याचे पूजन करून स्वागत गीत गायनाने झाली. डॉ. सौ.नेहा कुलकर्णी (हेर्लेकर) यांनी विद्यार्थ्यांना आरोग्य विषयक मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलचे दुष्परिणाम याविषयी मार्गदर्शन केले. हा पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम प्रशालेमध्ये माजी विद्यार्थी व पदाधिकाऱ्यांनी एस.एस.सी. परीक्षेमध्ये दरवर्षी उल्लेखनीय गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गुण गौरव करण्याच्या उद्देशाने रोख रक्कम देऊन आयोजित करण्यात येतो. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून दरवर्षी माजी विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात येते. या माजी विद्यार्थ्यांचा आदर्श नावलौकिक विद्यार्थ्यांच्या समोर सादर करण्याच्या उद्देशाने आमंत्रित करण्यात येते . या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते विशेष गुण प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांचा रोख रक्कम देऊन गुण गौरव करण्यात आला याप्रसंगी पालकांचेही विशेष स्वागत करण्यात आले.
         प्रशालेचे प्र.मुख्याध्यापक श्री. जी.एस.जांभळीकर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. जिमखाना प्रमुख श्री. एस. आर.गानबावले यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. एक आदर्श माजी विद्यार्थी यांनी समाजात मिळवलेला नावलौकिक त्यांचे दातृत्व याबद्दल माहिती विशद केली.याप्रसंगी समारंभ प्रमुख जगदीश जोशी यांनी आभार मानले. कार्यक्रमास दि प्रायव्हेट एज्युकेशन सदस्य श्री.अरूण डोंगरे, कार्यवाह सौ.एस.आर. डिंगणकर, कोषाध्यक्ष जी. एस. जांभळीकर, पर्यवेक्षक पी.एम. जोशी, जिमखानाप्रमुख एस.आर.गानबावले यांच्यासह सर्व अध्यापक आजी-माजी शिक्षक, विद्यार्थी ,पालक उपस्थित होते. सूत्रसंचालन सौ. शितल हिरेमठ आणि सौ. शुभांगी देसाई यांनी तसेच पारितोषिक प्राप्त विद्यार्थी यादी वाचन श्री. बी. एस. जाधव.यांनी केले. कार्यक्रमाची सांगता सीताराम जाधव यांच्या पसायदान सुमधुर गायनाने झाली.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30