नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , उपक्रमशील शिक्षक बी.के.गोंडाळ यांच्या कल्पकेतून जुवाठी शाळेत अक्षरमित्र हस्ताक्षर सुधार उपक्रम सुरु – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

उपक्रमशील शिक्षक बी.के.गोंडाळ यांच्या कल्पकेतून जुवाठी शाळेत अक्षरमित्र हस्ताक्षर सुधार उपक्रम सुरु

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

उपक्रमशील शिक्षक बी.के.गोंडाळ यांच्या कल्पकेतून जुवाठी शाळेत अक्षरमित्र हस्ताक्षर सुधार उपक्रम सुरु

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, राजापूर
तालुक्यातील जुवाठी येथील माध्यमिक विद्यालयात अक्षरमित्र हस्ताक्षर सुधार उपक्रम सुरू करण्यात आला.
जुवाठी विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक बी.के.गोंडाळ यांनी हा उपक्रम सुरू केला. यासाठी बी .के .गोंडाळ यांनी आपली आई कै. सौ.सावित्री केरु गोंडाळ यांच्या स्मरणार्थ इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांना हस्ताक्षर उपक्रमाच्या वह्या मोफत दिल्या .यावेळी शाळेचे मुख्याध्यापक वासुदेव गोवळकर, सहाय्यक शिक्षक रामदास सावंत, दीपक सूर्यवंशी, बी.के.गोंडाळ, लिपिक राजेंद्र मयेकर, वासुदेव भिवंदे,सुरेश गोसावी उपस्थित होते.
गेली अनेक वर्षे बी.के.गोंडाळ आपल्या शाळेत हस्ताक्षर सुधार उपक्रम राबवित आहेत.यावर्षी त्यांनी प्रथमच या उपक्रमासाठी आपल्या आईच्या स्मरणार्थ स्व:खर्चाने हस्ताक्षर सुधार उपक्रमच्या एक हजार वह्यांची छपाई केली आहे .आपल्या शाळेतील विध्यार्थ्यांसह तालुक्यातील इतर काही शाळेतून हा उपक्रम राबविणार असल्याची माहिती बी.के.गोंडाळ दिली.या त्यांच्या अभिनव उपक्रमाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30