श्रीमती वत्सलाताई पाटील गर्ल्स हायस्कूलच्या वतीने गारगोटी शहरात वृक्षदिंडी
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
श्रीमती वत्सलाताई पाटील गर्ल्स हायस्कूलच्या वतीने गारगोटी शहरात वृक्षदिंडी
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
सामाजिक वनीकरण परिक्षेत्र गारगोटी व श्रीमती वत्सलाताई पाटील गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, गारगोटी यांच्या वतीने गारगोटी शहरांमधून वृक्षदिंडी काढण्यात आली.
भुदरगड तालुक्याच्या वनक्षेत्रपाल उज्वला मगदूम व डॉ.डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुल, गारगोटीचे कॅम्पस डायरेक्टर विजयराव घोलपे यांच्या शुभहस्ते वृक्षदिंडीची सुरवात श्रीमती वत्सलाताई पाटील गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या प्रांगणातून झाली.
गारगोटी शहरातून वृक्षदिंडी गारगोटीच्या ऐतिहासिक हुतात्मा स्मारकाजवळ आल्यानंतर प्रशालेच्या मुलींनी वृक्षांचे महत्त्व समाजाला कळावे यासाठी पथनाट्याचे सादरीकरण केले. सादरीकरणातून मानवी जीवनासाठी व पर्यावरणासाठी वृक्षाचे महत्व नागरिकांना पटवून दिले.
यावेळी वनपाल आनंदा चोमडे यांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भुदरगड तालुक्यात सर्वात प्रथम यावर्षीच्या वृक्ष दिंडीचे आयोजन वन विभाग व शाळेमार्फत करण्यात आले अशी माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांना व गारगोटी शहरातील नागरिकांना वृक्ष लागवडीची जबाबदारी फक्त शासनाची नसून सर्वांची आहे. लोकसहभागातून फक्त झाडे लावू नयेत तर ती जगवण्यासाठी देखील आपण सर्वांनी सामूहिक प्रयत्न केले पाहिजेत असे आवाहन केले.
यावेळी प्रशालेचे सेवानिवृत्त शिक्षक राजेंद्र यादव यांनी आपले मनोगत व्यक्त केले व मुलांच्याकडून विविध घोषणा देत मोठ्या उत्साहात गारगोटी शहरातून वृक्षदिंडी पुढे नेली. यावेळी गारगोटी लोकनियुक्त सरपंच प्रकाश वास्कर, वनरक्षक पांडुरंग चव्हाण, प्रियांका येरुडकर व वन कर्मचारी यांचे स्वागत प्रशालेच्या वतीने प्राचार्या सौ. आर.बी.पाटील यांनी केले.
यावेळी नंदकुमार सांडुगडे,माणिक मगदूम, सुनील कासार, राजेंद्र साळोखे, सरदार ठाकूर, स्नेहल सावंत, सुप्रिया महाजन, वनिता मोरूस्कर, सुचेता अनावरकर, अश्विनी पाटील,रुपाली माने, मनीषा मोरस्कर, कविता साळवी उपस्थित होते. आभार सुशांत माळवी यांनी मानले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
