बालवयातील चांगल्या सवयी आयुष्यभर उपयुक्त ठरतात : बालसाहित्यिक संजय खोचारे
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
बालवयातील चांगल्या सवयी आयुष्यभर उपयुक्त ठरतात : बालसाहित्यिक संजय खोचारे
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, पिंपळगाव
एकतरी चांगला छंद जोपासा. वाचनाची आवड तुमचे आयुष्य बदलेल. बालवयात लावून घेतलेल्या चांगल्या सवयी आयुष्यभर उपयुक्त ठरतात, असे प्रतिपादन बालसाहित्यिक संजय खोचारे यांनी केले.
पिंपळगाव विद्यालयात आयोजित शिक्षण सप्ताह कार्यक्रमात कथाकथन सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. मुख्याध्यापक ए.डी.लांबोरे अध्यक्षस्थानी होते. शिक्षण सप्ताहानिमित्ताने कथाकथन सत्रात संजय खोचारे यांनी ग्रामीण कथा सादर केल्या. उत्तम वक्तृत्व कौशल्य आत्मसात करण्याबद्दल मार्गदर्शन केले. डी.ए.सोनटक्के यांनी प्रास्ताविक केले. यावेळी एस.एन. पाटील, एस.एस.आमणगी उपस्थित होते. युवराज भादवणकर यांनी आभार मानले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
