कर्मवीर हिरे महाविद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
कर्मवीर हिरे महाविद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
श्री.मौनी विदयापीठ संचलित कर्मवीर हिरे कनिष्ठ महाविद्यालयात गुरुपौर्णिमा कार्यक्रम उत्साहात झाला. उपप्राचार्य एस. जे. जितकर अध्यक्षस्थानी होते. पर्यवेक्षक ए. बी. पाटील प्रमुख उपस्थित होते.
यनिमित्त सर्व शिक्षकांचे विद्यार्थिनींनी औक्षण केले. विद्यार्थ्यांनी गुरुवंदन केले.
या वेळी गुरुपौर्णिमा आणि आषाढी एकादशीचे औचित्य साधून भक्ती गीतांचा ‘सूरों की बरसात’ कार्यक्रम झाला. तर विद्यार्थीनी मधुरा पोवार, सिद्धी सोनगेकर, स्नेहा नागदिवे, श्रद्धा शिंदे, चंदना चव्हाण, वैष्णवी कुंभार, दिया जाधव, रोशनी शिंदे, संजीवनी तिकोडे, पूजा पाटील, दिक्षा सुतार यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त मनोगत व्यक्त केले.
तर ‘सूरों की बरसात’ या कार्यक्रमात प्रा. सचिन चौगले, सिद्धी कवडे, शर्वरी पेडणेकर, अंकिता मिटके, सानिका सावंत, धनश्री कांबळे, सुविधा घरपणकर, अनुष्का तेळवे यांनी विविध भक्तीगीते सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले.
प्रा. धनाजी आरडे यांनी स्वागत केले.
प्रा. डी. एन. जाधव यांनी प्रास्ताविक केले. सिद्धी कवडे, शर्वरी पेडणेकर, श्रेया राजिगरे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. एस. एस. पाटील, प्रा. एस. बी. पाटील, प्रा. एस. सी. इंगवले, प्रा. एस. एस. वर्णे, प्रा. युवराज देसाई, प्रा. ए. पी. वारके आदी उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
