नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , कर्मवीर हिरे महाविद्यालयात विविध नवीन पदव्युत्तर अभ्यासक्रमांना मान्यता : प्रवेश प्रक्रिया सुरु असल्याची श्री.मौनी विद्यापीठाचे चेअरमन मधुकर देसाई व संचालक डॉ.पाटील यांची माहिती – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

कर्मवीर हिरे महाविद्यालयात विविध नवीन पदव्युत्तर अभ्यासक्रमांना मान्यता : प्रवेश प्रक्रिया सुरु असल्याची श्री.मौनी विद्यापीठाचे चेअरमन मधुकर देसाई व संचालक डॉ.पाटील यांची माहिती

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

कर्मवीर हिरे महाविद्यालयात विविध नवीन पदव्युत्तर अभ्यासक्रमांना मान्यता : प्रवेश प्रक्रिया सुरु असल्याची श्री.मौनी विद्यापीठाचे चेअरमन मधुकर देसाई व संचालक डॉ.पाटील यांची माहिती

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
येथील श्री.मौनी विद्यापीठ संचलित, कर्मवीर हिरे महाविद्यालयामध्ये महाराष्ट्र शासनाचा उच्च व तंत्र शिक्षण विभाग व शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या मान्यतेने शैक्षणिक वर्ष २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून एम. सी. ए., एम. एस्सी. ऑरगॅनिक केमिस्ट्री, एम. एस्सी. संगणकशास्त्र, एम. ए. अर्थशास्त्र व एम. ए. समाजकार्य (सोशल वर्क) या नवीन पदव्युत्तर अभ्यासक्रमांना मान्यता मिळाली आहे. या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु असल्याची माहिती श्री.मौनी विद्यापीठाचे चेअरमन मधुकर देसाई व संचालक डॉ. पी. बी.पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नवीन अभ्यासक्रमांच्या मान्यतेबाबत माहिती देताना चेअरमन मधुकर देसाई म्हणाले, “महाविद्यालयात पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या व त्यांची पदव्युत्तर शिक्षणाची मागणी पाहता सप्टेंबर २०२३ मध्ये कर्मवीर हिरे महाविद्यालयाच्यावतीने विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमांची मागणी शिवाजी विद्यापीठाकडे केली होती. त्याबाबतचे प्रस्ताव शिवाजी विद्यापीठाकडे पाठवले होते. त्यानंतर विद्यापीठाने तो प्रस्ताव महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाला पाठवला. राज्य शासनाने मंत्रिमंडळाची विशेष बैठक घेऊन या नवीन अभ्यासक्रमांना मान्यता दिली. तसे पत्र महाविद्यालयास मिळाले आहे.
श्री.मौनी विद्यापीठाचे संचालक डॉ. पी. बी. पाटील म्हणाले, “मौनी विद्यापीठाच्या शैक्षणिक संकुलात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नवीन पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याची सूचना विद्यापीठाचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी केली होती. त्यानुसार विद्यार्थ्यांची मागणी व सध्या ज्या अभ्यासक्रमांना व्यवसाय रोजगाराच्या संधी आहेत याची माहिती घेऊन रसायनशास्त्र, संगणकशास्त्र, अर्थशास्त्र व समाजकार्य या विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाची मागणी करण्यात आली. या अभ्यासक्रमांना मान्यता देण्यासाठी गेल्या वर्षभरात शिवाजी विद्यापीठ व महाराष्ट्र शासनाच्या विविध समित्यांनी महाविद्यालय व संस्थेत भेट देऊन आवश्यक शैक्षणिक, भौतिक व विद्यार्थी सोय आदी सुविधांची पाहणी केली होती. सर्वच समित्यांनी मौनी विद्यापीठात असलेल्या शैक्षणिक, भौतिक सुविधांच्या बरोबर विद्यार्थ्यांच्या संख्येबाबत समाधान व्यक्त केले होते. शिवाजी विद्यापीठ व महाराष्ट्र शासनाचे सर्व निकष पूर्ण केल्यानेच यावर्षी कर्मवीर हिरे महाविद्यालयात नवीन पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याची मान्यता मिळाली आहे. या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. तालुका व परिसरातील विद्यार्थ्यांनी या नवीन अभ्यासक्रमांना त्वरित प्रवेश घ्यावेत.
नवीन अभ्यासक्रमांचा मान्यतेसाठी मौनी विद्यापीठाचे विश्वस्त मंडळ व
सर्व पदाधिकारी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
या पत्रकार परिषदेस शासकीय प्रतिनिधी बाजीराव चव्हाण, कर्मचारी प्रतिनिधी डॉ. अरविंद चौगले,
प्रभारी प्राचार्य डॉ. जी. एस. म्हांगोरे उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30