नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , पाठ्यपुस्तकातील मराठी भाषेचा वापर योग्य आहे की नाही तपासून शासनास अहवाल सादर करा : राज्य भाषा सल्लागार समितीची मागणी – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

पाठ्यपुस्तकातील मराठी भाषेचा वापर योग्य आहे की नाही तपासून शासनास अहवाल सादर करा : राज्य भाषा सल्लागार समितीची मागणी

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

पाठ्यपुस्तकातील मराठी भाषेचा वापर योग्य आहे की नाही तपासून शासनास अहवाल सादर करा : राज्य भाषा सल्लागार समितीची मागणी

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, मुंबई
राज्य शिक्षण मंडळांतर्गत येणाऱ्या सर्व इयत्तांच्या पाठ्यपुस्तकातील मराठी भाषेचा वापर योग्य आहे की नाही ते तपासून शासनास अहवाल सादर करावा. यासाठी संबंधित अशासकीय तज्ज्ञांच्या एका समितीची शासनाने नियुक्ती करावी, अशी मागणी राज्य भाषा सल्लागार समितीकडून करण्यात आली आहे.
समितीचे सदस्य श्रीपाद जोशी यांनी राज्याचे मुख्यमंत्री नाम.एकनाथ शिंदे, शिक्षणमंत्री नाम. दीपक केसरकर आणि बालभारतीचे अध्यक्ष कृष्णकुमार पाटील यांना पत्राद्वारे मागणी केली आहे. बालभारतीच्या पहिलीच्या मराठीच्या पुस्तकातील ‘जंगलात ठरली मैफल’ या कवितेत वापरलेल्या इंग्रजी शब्दांवरून वाद प्रतिवाद सुरू आहेत. त्यासंदर्भात साहित्यिक आणि भाषातज्ज्ञ यांच्याकडून मत मतांतरे व्यक्त होत आहेत. ‘जंगलात ठरली मैफल’ ही मूळ कविता पूर्वी भावे यांची आहे. २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून बालभारतीने पहिलीच्या वर्गासाठी लागू केलेल्या मराठी बालभारती या पुस्तकात या कवितेचा समावेश करण्यात आला आहे. यामधील इंग्रजी शब्दांमुळे ती आधी सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि आता भाषातज्ज्ञ, साहित्यिक, मराठी भाषेचे जाणकार, शिक्षण तज्ज्ञांकडून त्यावर मते व्यक्त होऊ लागली आहेत. मराठीच्या कवितेत इंग्रजी शब्दांच्या वापरामुळे मराठी भाषेवर चुकीचे संस्कार होत आहेत, ते थांबवावेत अशी टीका जोशी यांनी केली.
बालभारतीने खालील बाबींबाबत खुलासा करावा असेही सुचविले आहे.
१) बालभारतीकडून या कवितेची निवड करताना कोणते बालशैक्षणिक मानसशास्त्र बघितले गेले आहे, याचाही खुलासा बालभारतीने करावा, अशी मागणी केली आहे.
२) बालभारतीच्या संपादक मंडळ तसेच अभ्यास मंडळ, निवड समिती यांना साहित्य नेमण्यासाठी त्यांना कोणत्या मार्गदर्शक सूचना आहेत, त्यांची प्रत बालभारतीने उपलब्ध करावी, असे त्यांनी म्हटले आहे.
३) राज्याने प्रथमच मराठी भाषा धोरण तयार करून ते स्वीकारले आहे. त्यामुळे मराठी भाषेचा यथायोग्य वापर व्हावा, हा त्याचा पाया आहे. याकडे लक्ष देण्याची गरज समितीकडून व्यक्त करण्यात आली आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30