नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , आण्णाभाऊंनी साहित्याचा उपयोग समाज परिवर्तनासाठी केला : श्री.व्ही.जे.कदम – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

आण्णाभाऊंनी साहित्याचा उपयोग समाज परिवर्तनासाठी केला : श्री.व्ही.जे.कदम

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

आण्णाभाऊंनी साहित्याचा उपयोग समाज परिवर्तनासाठी केला : श्री.व्ही.जे.कदम

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे हे महान प्रतिभावंत साहित्यिक होते. साहित्याचा उपयोग आण्णाभाऊंनी समाज परिवर्तनासाठी केला, असे उदगार लोकशाहीर आण्णाभाऊ साठे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री.व्ही.जे.कदम यांनी काढले.
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री. राजर्षी शाहू विद्यार्थी वसतिगृह, गारगोटी येथे आयोजित लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती समारंभात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
यावेळी बोलताना श्री. कदम म्हणाले, आण्णाभाऊंच्या वाट्याला फक्त दीड दिवसाची शाळा आली पण त्यांनी साहित्यक्षेत्रात जागतिक स्तरावर स्थान मिळविले. यावेळी प्रमुख वक्ते श्री.डी.जी.कांबळे यांनी आण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्र्यावर प्रकाशझोत टाकला.
यावेळी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्राचार्य मिलिंद पांगिरेकर, श्री. मौनी महाराज (बनारस) हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री.एन.जी. कांबळे यांच्यासह कु.ऋग्वेद गुरव, कु. विदित जाधव, कु. सावन पोवार, कु. सुमित वडर, कु. प्रथमेश धुरी या विद्यार्थ्यांनी भाषणे केली.
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक वसतिगृहाचे अधीक्षक साताप्पा कांबळे यांनी तर आभार श्री.सुचित कांबळे यांनी मानले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728