नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , विजय डोणे सेवाभावी व समर्पण वृत्तीचा शिक्षक : निवृत्त शिक्षण संचालक उज्ज्वलाताई पाटील – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

विजय डोणे सेवाभावी व समर्पण वृत्तीचा शिक्षक : निवृत्त शिक्षण संचालक उज्ज्वलाताई पाटील

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

विजय डोणे सेवाभावी व समर्पण वृत्तीचा शिक्षक : निवृत्त शिक्षण संचालक उज्ज्वलाताई पाटील

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
शालेय जीवनात उचित, उत्तुंग ध्येय बाळगून त्याचा प्रामाणिकपणे पाठलाग करा, या प्रशालेत आप्पासाहेब पवार,श्री.मौनी विद्यापीठाचे संस्थापक डॉ.जे.पी.नाईक, विष्णुपंत घाटगे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, गोपाळ कृष्ण गोखले, गोपाल तांबे, सरोज कुमार मिठारी यासारखे प्रतिभावंत विद्यार्थी घडले. तुम्हीही तुमच्या गुरूंची शिकवण , संस्कार व तुमच्या प्रयत्नांच्या जोरावर आपले स्वप्न साकार करा. विजय डोणेसारखा सेवाभावी ,समर्पण वृत्तीचा मुख्याध्यापक तुम्हांला लाभला हे तुमचे भाग्य आहे, असे मत प्रतिपादन महाराष्ट्र राज्याच्या निवृत्त शिक्षण संचालक उज्ज्वलादेवी पाटील यांनी व्यक्त केले.
मेन राजाराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कोल्हापूर येथे प्राचार्य विजय डोणे यांच्या सेवापुर्ती सदिच्छा समारंभ प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती पाटील बोलत होत्या.
यावेळी माजी प्राचार्य डॉ. वसंतराव पाटील अध्यक्षीय मनोगतात म्हणाले, वेळ ,काळ याची पर्वा न करता अधिकाधिक वेळ फक्त प्रशालेच्या गुणवत्ता वाढीसाठी, विस्तारासाठी देत कायमस्वरूपी पार्किंग व्यवस्था, प्राचार्य पदाची धुरा सांभाळत ,अध्यापनाचे वर्ग सांभाळत विजय डोणे हे खरंच एक समाज शिक्षक म्हणून ही शिक्षण क्षेत्राला लाभले.
सत्कारमूर्ती विजय डोणे यांनी आपल्या मनोगतात मेन राजाराम सारख्या ऐतिहासिक वास्तुत मला काम करायला मिळाले.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गेली 27 वर्ष मी प्रामाणिकपणे सेवा केली. यावेळी सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनी हिंदकन्या छात्रालयासाठी 25000, लीलाताई पाटील यांच्या ट्रस्टला 25000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला.
विजय डोणे यांच्या कार्याचा गौरव सानिका गायकवाड, ऐश्वर्या राऊत, पायल दिगंबरे या विद्यार्थ्यांनी व प्रा. बाबासो माळवे, प्रा. बाबुराव यादव, प्रा. हर्षवर्धन काटकर या शिक्षकांनी तसेच कनिष्ठ महाविद्यालय संघटनेचे प्रा.संजय मोरे महावीर कॉलेजचे डॉ .प्रा. गोपाळ गावडे यांनीही केला. तसेच त्यांचा माहितीपट प्रा. अयोध्या धुमाळ, प्रा. दीपा लोहार यांनी पीपीटी द्वारे करून दाखवला. यावेळी विजय डोणे, डॉ प्रमिला डोणे यांचा सप्निक सत्कार करण्यात आला.
प्रास्तविक उपप्राचार्य डॉ.गजानन खाडे, स्वागत प्रा. वनिता खडके सुत्रसंचलन प्रा. सुषमा पाटील,आभार प्रा.राहुल देशमुख यांनी केले. यावेळी माजी गटशिक्षणाधिकारी ए.बी. देशमुख, माजी प्राचार्य, लोकनियुक्त सरपंच बी सी कदम, पर्यवेक्षिका शितल पत्रावळे, वि .स.खांडेकर प्रशाला कोल्हापूर च्या माजी मुख्याध्यापिका उषा देवी देशमुख,पी.एच.देशमुख, कु.सुखदा ,कु.अदिती डोणे , के.डी पवार, प्रा,अतुल देवकर , वित्त विभागाचे उमेश कुलकर्णी,संजय साळोखे, शिवाजी टेक्निकल , कोल्हापूर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय टिचर असोसिएशन चे पदाधिकारी, कोल्हापूर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय इंग्रजी शिक्षक संघटनेचे प्रा . रविंद्र पोर्लेकर,तसेच जिल्हा परिषद कोल्हापूर संचलित असणाऱ्या शिंगणापूर, गडहिंग्लज, गगनबावडा,मेन राजाराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कोल्हापूर चे माध्यमिक उच्च माध्यमिक प्रशालेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी पालक या कार्यक्रमास उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30