नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , श्रीमती वत्सलाताई पाटील गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये मातृदिन साजरा – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

श्रीमती वत्सलाताई पाटील गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये मातृदिन साजरा

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

श्रीमती वत्सलाताई पाटील गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये मातृदिन साजरा

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
डॉ. डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुल गारगोटी संचलित श्रीमती वत्सलाताई पाटील गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, गारगोटी प्रशालेमध्ये दरवर्षी प्रमाणे श्रीमती वत्सलाताई पाटील यांचा स्मृतिदिन ‘मातृदिन’ म्हणून साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्रशालेच्या मुख्याध्यापिका आर.बी.पाटील होत्या.
प्रारंभी श्रीमती वत्सलाताई पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन डॉ. डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुलाचे कॅम्पस डायरेक्टर विजयराव घोलपे व सारिका पाटील (गट प्रवर्तक अशा सेविका पिंपळगाव आरोग्य केंद्र) यांच्या हस्ते झाले. श्री.सुनील कासार यांनी मातृदिन साजरा करण्यामागचा उद्देश सांगितला.
पाहुण्यांचा परिचय प्रा.एम.जी.मगदूम सर यांनी करून दिला. प्रमुख वक्त्या सारिका पाटील व विजयराव घोलपे यांचे स्वागत प्रशालेच्या वतीने मुख्याध्यापिका आर.बी.पाटील यांनी केले.
यावेळी १० वी मध्ये प्रथम समीक्षा दत्तात्रय पाटील, द्वितीय वैष्णवी वसंत केसरकर तृतीय अपूर्वा आरेश भोसले व १२ वी कला विभाग प्रथम सलोनी गुरव द्वितीय अमूल्य दिलीप वर्पे तृतीय साक्षी रवींद्र रेडेकर बँकिंग विभाग प्रथम उमेसानिया अहमदरफीक वाटंगी द्वितीय मयुरी तानाजी माणगावकर तृतीय सुनिता ठकू हुंबे इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी विभाग प्रथम सोनाली खंडू बेलेकर द्वितीय स्नेहा सातापा सुतार तृतीय आशिया फिरोज पठाण यांचे विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थिनींचे सत्कार करण्यात आले.
कु.साक्षी सुभाष मोहिते या विद्यार्थिनीला पैशाची पर्स कॅम्पस मध्ये मिळाली होती ती प्रामाणिकपणे शिक्षकांच्याकडे आणून दिल्याबद्दल तिच्या प्रामाणिकपणाचे कौतुक म्हणून तिचा सन्मान करण्यात आला. यावेळी मराठी विषयातून सेट उत्तीर्ण झाल्याबद्दल मनीषा मोरस्कर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थिनींचा यावेळी सत्कार करण्यात आला.
सौ. विजयमाला घोलपे यांनी श्रीमती वत्सलाताई पाटील यांचा जीवन परिचय व त्यांनी केलेला संघर्ष तसेच डॉ. डी. वाय. पाटील साहेब यांच्या आई श्रीमती वत्सलाताई पाटील यांनी त्याच्यावर कशाप्रकारे संस्कार केले हे मुलींना सांगितले.
प्रमुख वक्त्या सारिका पाटील यांनी मुलींना मार्गदर्शन करताना हसत खेळत मनापासून एखादी नवीन गोष्ट शिकत असताना त्याचा आनंद घ्या. तसेच आपल्या आई चे ऋण कधीही फिटत नसतात तर आपण आई वडिलांच्या ऋणात राहिलेलच बरं असत असे मुलांना सांगितलं. प्रत्येक व्यक्तिमत्व जडणघडणीमध्ये आईचा वाटा अनन्यसाधारण आहे यावेळी त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्यामुळे सर्व स्त्रीयाना विविध क्षेत्रामध्ये येण्याची संधी मिळालेली आहे. तसेच माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्यामुळे ग्रामीण भागातील हजारो मुलींना शिक्षण घेता आले. व स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी मिळाली त्या संधीचे तुम्ही देखील सोने करा असे विद्यार्थिनींना आवाहन केले.
यावेळी प्राची मोरस्कर,गौरी देसाई,नेहा देसाई,सानिका पाटील, ज्ञानेश्वरी कांबळे,अफिया शेख,आराधना ऐतवडेकर या विद्यार्थिनींनी व अश्विनी पाटील यांनी मातृदिनाविषयी आपली मनोगते केली.
यावेळी ग्रा.प.सदस्या रुपाली राऊत, स्नेहल सावंत, वनिता मोरुस्कर,सुचित्रा अनावकर,सुप्रिया महाजन,मंदाकिनी कासारीकर,रुपाली माने,दिपाली साळोखे,नंदकुमार सांडूगडे,गंगाधर माळी, राजेंद्र साळोखे,पांडुरंग कांबळे,सुशांत माळवी,अमोल शिंत्रे,महेश भांबर, तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थिनी उपस्थितीत होते. सूत्रसंचालन
कु.श्वेता देसाई व सलोनी सारंग यांनी केले. तर आभार गायत्री यादव हिने मानले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30